अकिवाट / प्रतिनिधी
अकिवाट केंद्रांतर्गत अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेत कुमार विद्या मंदिर अकिवाट शाळेने जनरल चॅम्पियनशिप पटकावले.मोठ्या गटामध्ये कुमार अकिवाट शाळेचे घवघवीत यश संपादन केले.खो-खो व कबड्डी मुलांनी प्रथम क्रमांक,रिले १००x४प्रथम क्रमांक मिळविला.
मोठा गट वैयक्तिक क्रीडा प्रकारातील१०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर धावणे प्रकारात वेदांत बंडू कोळी प्रथम क्रमांक मिळविला.तर २०० मी.धावणे मध्ये द्वितीय क्रमांक व ६०० मी.धावणेमध्ये देवराज क.छत्रे याने प्रथम क्रमांक मिळविला.थाळी फेकमध्ये अनुप ल.कांबळे प्रथम क्रमांक,आदर्श अ.कांबळे द्वितीय क्रमांक,लांबउडी मध्ये अभिनव गायकवाड प्रथम क्रमांक,गोळाफेक मध्येअनुप ल.कांबळे तृतीय क्रमांक,उंच उडी प्रकारात आदर्श कांबळे द्वितीय क्रमांक,लहान गट सांघिक खो-खो मुले प्रथम क्रमांक,कबड्डी मुले प्रथम क्रमांक तर लहान गट वैयक्तिक स्पर्धा प्रकारात ५० मीटर धावणे मध्ये आदित्य पाटील प्रथम क्रमांक १०० मीटर धावणेमध्ये आदित्य पाटील प्रथम क्रमांक,लांब उडी मध्ये आदित्य पाटील प्रथम क्रमांक,वरूण कांबळे द्वितीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.यशस्वी खेळाडूंना गट शिक्षण अधिकारी भारती कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे,केंद्रप्रमुख सुरेश कोळी यांची प्रेरणा मिळाली तर मुख्याध्यापक दिलीप पाटील, जोतिबा डकरे,सुरेश रानगे यांचे मार्गदर्शन लाभले.