गुटखा वाहतुक करणार्या एकावर कारवाई,गुटख्याचा ८१ हजार ३९६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथे गुटखा वाहतुक करीत असताना शिरोळ पोलिसांनी गुरुवारी रात्री कारवाई केली. सलीम नदाफ यांच्याकडून विविध प्रकारचा गुटखा व सुगंधीत तंबाखू असा 81 हजार 396 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.संशयित आरोपी सलीम नदाफ याला शिरोळ पोलिसांनी अटक केली असून शुक्रवारी जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची न्यायालय कोठडी सुन्यावण्यात आली आहे.शिरोळ पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, संशयित आरोपी सलीम नदाफ हा कुरुंदवाड-शिरोळ जाणार्या जुन्या मार्गावरील पंचगंगा नदीच्या बंधार्याजवळ स्मशानभुमीजवळ सुझुकी अॅक्सेस मोपेड पांढर्या रंगाच्या मोटरसायकल (क्रमांक एम 09 ईआर 4881) यातून 1 हजार 400 रुपयांचा बी 1 सुगंधीत तंबाखु 50 पाऊच, 6 हजार 240 रुपयांचा विमल पान मसाला 52 पाऊच, 3 हजार 432 रुपयांचा वी 1 सुगंधीत तंबाखू 104 पाऊच, 9 हजार 724 रुपयांचा विमल पान मसाला 52 पाऊच व 55 हजार रुपयांची मोटरसायकल असा 81 हजार 396 रुपयांचा मुद्देमाल शिरोळ पोलिसांनी हस्तगत केला आहे.ही कारवाई गुरुवारी 9 च्या सुमारास करण्यात आली. त्यानंतर शिरोळ पोलिसांनी संशयित आरोपी सलिम नदाफ याला अटक केली होती. शुक्रवारी संशयित आरोपी सलिम नदाफ याला जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायलायासमोर उभे केले असता 3 दिवसांची न्यायालीन कोठडी मिळाली आहे. याबाबतची फिर्याद पोलिस नाईक अभिजित दिलीप परब यांनी शिरोळ पोलिसांत दिली आहे.