ट्विंकल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये क्रीडा महोत्सवास प्रारंभ

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

 

पुलाची शिरोली येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये २१/१२/२०२३ ते २३/१२/२०२३ पर्यंत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थापक अध्यक्ष संतोष संभाजी बाटे व तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष राजू पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलन करण्यात आले. क्रीडांगणाचे पूजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष बाटे व प्राचार्य सौ. मनीषा बाटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सर्व शाळेतील शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मधील सर्व मुलांनी योग्य पद्धतीने क्रीडा ध्वज सहित मार्चिंग करून दाखविले व मुलांनी क्रीडा महोत्सवा मध्ये उस्फूर्तपणे सहभागी होऊन आपले कौशल्य क्रीडा शिक्षक दिशा लोहार व मान्यवरांना दाखविण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा लोखंडे यांनी केले.प्रतीक्षा पाटील, पुनम बांगी,सारिका काळे,प्राजक्ता पाटील,पूजा पाटील, कविता ठोंबरे,स्नेहल कोरे या सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Spread the love
error: Content is protected !!