जयसिंगपूर /प्रतिनिधी
रोटरी क्लब जयसिंगपूर संचलित स्वर्गीय दानचंद घोडावत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजक व त्याच्या विशेष सहकार्यातून जयसिंगपूर शहराच्या मध्यवस्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात गरीब गरजवंतांच्यासाठी माणुसकीची भिंत या सदराखाली मोफत जुने व नवी कपडे उपलब्ध करून दिले आहेत याचा शुभारंभ शिरोळ तालुक्याचे माजी आरोग्य मंत्री व विद्यमान आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर,उद्योगपती विनोदभाऊ घोडावत,रौनक घोडावत,रोटरी क्लब
जयसिंगपूरचे अध्यक्ष रोटे संजय माणगावे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. यावेळी शहराच्या सामाजिक सेवेमध्ये रोटरी क्लब जयसिंगपूरने उचललेले एक नवे पाऊल आणि यासाठी स्वर्गीय दानचंद घोडावत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्टने दिलेलं मोठं योगदान फार
कौतुकास्पद असून रोटरी क्लब जयसिंगपूरने गेल्या साठ वर्षात शहराच्या विकास कामात अनेक उपक्रम राबवले असून रोटरी क्लब जयसिंगपूरचे काम अत्यंत सुंदर व कौतुकास्पद आहे.शिरोळ तालुक्यामधील सर्वात ज्येष्ठ सामाजिक संस्था रोटरी म्हणून साठ वर्ष पूर्ण केलेली
सामाजिक संस्था म्हणून त्याचा नावलौकिक आहे. आत्तापर्यंत केलेली कार्य हे आजही लोकांच्या स्मरणात आहेत.जयसिंगपूर भूषण पुरस्कार असेल, स्मशानभूमीचे नूतनीकरण,शालेय संस्थांना मदत, व्होकेशनल अवॉर्ड्स अशा विविध समाज उपयोगी कामात नेहमी आघाडीवर असतात आणि ते त्यांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी हे कार्यक्रम असे चालू ठेवावेत व त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा असेल असे गौरव उदगार आमदार डॉ.राजेंद्र पाटील यांनी काढले.यावेळी भरीव देणगी व स्वतःची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल रोटे विनोदभाऊ घोडावत यांचा सत्कार व मानपत्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.स्वागत प्रोजेक्ट चेअरमन भरत माणगावे यांनी केले. स्वर्गीय दानचंद घोडावत यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रास्ताविक रोटे रुस्तुमभाई मुजावर यांनी केले.यावेळी मान्यवरांचा सत्कार करत असताना या उपक्रमासाठी मदत केलेल्या देणगीदारांपैकी रोटे सुमित पाटील,रोटे शंकर बजाज,रोटे बाळासाहेब नंदुरगे यांचा सत्कार करण्यात आला.आभार रोटरी क्लबच्या सेक्रेटरी विद्यासागर आडगाणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीचे अध्यक्ष सुदर्शन कदम, रोटरी क्लब ट्रेड सिटीचे अध्यक्ष अभय बनजवाडे,रोटरी क्लब जयसिंगपूरचे सदस्य राजेंद्र पाटील-भोजकर, रमेश इंगळे, प्रकाश निटवे,अँड.श्रीकांत घोडके, गौतम झेले, सचिन शेडबाळे,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत अण्णा झेले,माजी नगरसेवक बजरंग खामकर, सुमित पाटील, सुदर्शन चौगुले, सौ अरुणा पाटील, सौ सविता पाटील, आर एस कुलकर्णी,डॉ वसुंधरा घोडके,
सुमित पाटील (इको ),स्वप्निल इंगळे,सुरजित देसाई, डॉ.स्वप्नील पाटील,शरद चौगुले,अजय सागर मगदूम, आसिफ पटेल,डॉ.अकलंक चौगुले,जितेंद्र पाटील, रावसाहेब पाटील,सुदर्शन एडवान, राजेंद्र चौगुले,संतोष माने आदी उपस्थित होते.