
अब्दूललाट / प्रतिनिधी
मास्टर जिनेन्द्र सांगावे वय वर्षे 14 यांनी एम आर एफ नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिप 2023 या स्पर्धेमध्ये 450cc ‘ग्रुप A’ वय 16 वर्षे वयोगटातील स्पर्धेत भाग घेतला होता.मात्र स्पर्धेच्या दोन दिवस पूर्वी जिनेन्द्र याची रेसिंग बाईक एका मोठ्या स्पर्धेमध्ये अपघात झाल्याने संपूर्ण गाडी चक्काचुर झाली.दोनच दिवसात नॅशनल चॅम्पियनशिपचे रेस असल्याने तिथेच एक सेकंड हॅन्ड गाडी खरेदी करून स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला परंतु सेकंड हॅन्ड गाडी खराब लागल्याने कोयंबतूर-गोवा-बडोदा-बेंगलोर- मेंगलोर -मैसूर या सहा शहरांमध्ये झालेल्या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धेमध्ये काही ना काही तांत्रिक बिघाड झाल्याने सर्व ठिकाणी दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.इंजिन स्टॉपिंग इशू,ब्रेक फेल इशू,थ्रोटल इशू,सस्पेन्शन इशू अशा सर्वच गोष्टींवर मात करीत स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करीत संपूर्ण नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा अभिमानास्पद मानकरी ठरला.जिनेन्द्र हा याच स्पर्धेमधील ओपन 500cc मोठ्या गटात 2022 सालचा ऐतिहासिक चॅम्पियन आहे.एप्रिल 2023 मध्ये मोटोक्रॉस स्पर्धेची सुरुवात झाली होती कोयंबतूर गोवा बडोदा या स्पर्धेनंतर जुन मध्ये जिनेन्द्रने चेन्नई येथे सर्किट रोड रेसिंग मध्ये देखील सहभाग नोंदवला होता.परंतु या स्पर्धेमध्ये जिनेन्द्र च्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने पाच महिने सराव न करता विश्रांती घ्यावी लागली.नोव्हेंबर मध्ये पुन्हा मोटोक्रॉसच्या उर्वरित तीन स्पर्धांना सुरुवात झाली. डॉक्टरांनी ऑपरेशन नंतर दहा महिने विश्रांती सांगून देखील पुन्हा पाचव्या महिन्यातच स्पर्धेला सुरुवात केली.एका खेडेगावातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील जिनेन्द्रच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.या स्पर्धेसाठी त्याचे चुलते सागर सांगावे हे मार्गदर्शन करत आहेत.तसेच ऍक्सर आणि वेगा हेल्मेट कंपनी बेळगावी, मोहिते रेसिंग अकॅडमी कोल्हापूर,आवाडे मोटर स्पोर्ट्स,टी टू रेसिंग व्हिलेज बरोडा यांचे सहकार्य मिळत आहे.जिनेन्द्रच्या पुढील स्पर्धांसाठी अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा मिळत आहेत.