‘धक्कादायक’ चालू फडाला आग ; वाहनधारकांसह ऊसतोड कामगारांची उडाली तारांबळ..!

तेरवाड / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील हद्दीत ऊसतोड सुरू असणाऱ्या क्षेत्राला अचानक आग लागल्याने वाहनधारक तसेच ऊसतोड कामगारांची पळापळ झाली. अखेर फडातील वाहने तसेच कामगारांना बाहेर काढण्यात यश आल्यामुळे मोठी हानी टळली. या आगीत सुमारे ७ ते ८ एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, हेरवाड – मजरेवाडी रोड लागत असलेल्या तेरवाड हद्दीत नंदकिशोर पाटील या शेतकऱ्याच्या शेतात ऊसतोड सुरू होती. ऊसतोड सुरू असताना अचानक फडाला आग लागल्याने उसाच्या फडात असणारे वाहन तसेच ऊसतोड कामगार अडकले. शेतकरी आणि ऊसतोड कामगारांनी प्रसंगावधान राखल्याने शेतातील वाहन तसेच ऊसतोड कामगारांना बाहेर काढल्याने मोठी हानी टळली. सदरची आग परिसरातील ऊस क्षेत्राला लागल्याने लगत असणाऱ्या रामचंद्र आसनेकर यांचे उसाचे क्षेत्रही आगीच्या भस्मस्थानी पडले. उस क्षेत्रात ठिबक असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Spread the love
error: Content is protected !!