पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
माजी ग्रामीण विकास मंत्री आर .आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेत हातकणंगले तालुक्यात पुलाची शिरोली ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. 2022 – 23 मध्ये सुंदर गाव या योजने अंतर्गत केलेल्या कामाची सण 23 24 मध्ये क्रॉस तपासणी करण्यात आली होती. यामध्ये शिरोली ग्रामपंचायतीस शंभर पैकी ९१ गुण मिळाले आहेत. या पुरस्कारामुळे दहा लाखाचे बक्षीस प्राप्त झाले आहे. हि घोषणा गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी केली आहे.या स्पर्धेमध्ये पुलाची शिरोली,आंबप,कासारवाडी ,नागाव , कापूरवाडी , बिरदेव वाडी , दुर्गेवाडी, जुने पारगाव,साजणी, नेज , नरंदे , नवे पारगाव , तासगाव , व.त.वडगाव, चावरे या गावांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये पुलाची शिरोली या ग्रामपंचायतीला मूल्यमापन समितीने 91 मार्क देऊन प्रथम क्रमांक देण्यात आला.ग्रामपंचायतीने राबविलेला घनकचरा व्यवस्थापण, सांडपाणी नियोजन, अंतर्गत स्वच्छता, शासकीय योजनांची परिपूर्ण अंमलबजावणी, माझी वसुंधरा उपक्रम, विज बचत (एलईडी योजना), साथीच्या आजार होवू नये यासाठी घेतलेली खबरदारी अशा अनेक कामांचा केलेला पाठपुरावा यामुळे शिरोली ग्रामपंचायत बक्षिसास प्राप्त ठरली आहे. या पुरस्कारातून मिळालेली रकमेतून अपारंपारिक ऊर्जा संबंधित अभिनव प्रकल्प स्वच्छतेबाबत प्रकल्प महिला सक्षमीकरण स्वच्छ पाणी वितरण सौर पथदिवे बसविणे अतिक्रमण रोखण्यासाठी कुंपण घालने तसेच नागरिकांच्या सोयीसाठी इंटरनेट वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देता येणार आहे.आता जिल्हा पुरस्काराच्या द्रूष्टीने पुढील काळात कामकाज करणार असल्याचे सरपंच सौ.पद्मजा करपे व ग्रामविकास अधिकार ए.वाय.कदम यांनी सांगितले. तसेच त्यांनी ग्रामस्थ, अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य केले बद्दल आभार मानले आहेत.या पुरस्काराबद्दल ग्रामस्थांच्याकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.