
शिरोळ / प्रतिनिधी
कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर्स असोसिएशनचे ७ वे छायाचित्र प्रदर्शन शनिवार दि.२३ डिसेंबर २०२३ ते सोमवार दि. २५ डिसेंबर २०२३ अखेर मंगलधाम ,DKTE कॉलेज जवळ, इचलकरंजी, जि.कोल्हापूर येथे आयोजित केले असल्याची माहिती कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर्स असोसिएशन सेक्रेटरी अभिजीत आडूरकर यांनी दिली.
कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर्स असोसिएशन हा कोल्हापूर जिल्हा व आजूबाजूच्या जिल्ह्यातील एकमेव व पहिला फोटोग्राफी ग्रुप आहे जो फेडरेशन ऑफ इंडियन फोटोग्राफी कडे रजिस्टर आहे.२०१५ मध्ये ज्ञानेश्वर वैद्य यांनी या ग्रुपची स्थापना केली.प्रत्येक महिण्याला मिटींग आयोजीत केली जाते.यामध्ये फोटोग्राफी संदर्भात चर्चा केली जाते,फोटोवॉकचे आयोजन केले जाते. लाईट,काम्पोझिशन,स्टोरी,कॅमेरा सेटिंग यासारख्या अनेक विषयावर सखोल अभ्यास केला जातो.देश विदेशात फोटोग्राफी स्पर्धामध्ये सहभाग कसा घेता येतो याबध्दल इथे माहिती व तयारी करुन घेतली जाते. महाराष्ट्रातील व देशभरातील विविध संस्कृतींचे, रुढी-परंपरेचे,समृध्द निसर्ग आणि जैव विविधतेचे शास्त्रोक्त छायाचित्रण करुन ते निस्वार्थी भावणेने,कर्तव्य समजून जगभर पोहचवण्याचे काम या ग्रुपचे मेंबर्स करत असतात. थीमवर आधारीत असे पश्चिम महाराष्ट्रातील तिसरे छायाचित्र प्रदर्शन हे या प्रदर्शनाचे वैशिष्ठ्य आहे.या प्रदर्शनात कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर्स असोसिएशनच्या २६ मेंबर्सनी वेगवेगळे विषय घेऊन स्टोरीवाईज फोटोग्राफी केली आहे.हे फोटो व सर्व मेंबर्सचे एकूण ३५० हुन फोटो या प्रदर्शनात आपणास पहायला मिळणार आहेत.या प्रदर्शनाचे उदघाटन रमण कुलकर्णी (मानद वन्यजीव रक्षक,सदस्य,महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ) यांचे शुभहस्ते दि.२३ डिसेंबर २०२३ ते सोमवार दि.२५ डिसेंबर २०२३ अखेर मंगलधाम ,DKTE कॉलेज जवळ, इचलकरंजी येथे सकाळी १०.०० वा. संपन्न होणार आहे.तसेच सौ.पूजा गद्रे -फडके (दै.तरुण भारत संवाद,उपसंपादक, सांगली),अनंतसिंग रजपूत (जेष्ठ pres फोटोग्राफर) छोटुसिंग रजपूत (जेष्ठ प्रेस फोटोग्राफर),रशीद मतवाल (जेष्ठ चित्रकार) ज्ञानेश्वर वैद्य (EFIP, AFIAP) आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.तरी या छायाचित्र प्रदर्शन पहायला यावे असे आवाहन कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर्स असोसिएशन अध्यक्ष संतोष काळे,सेक्रेटरी अभिजीत आडूरकर यांनी केले आहे.