दत्त साखर कारखाना साखर शाळेस गट शिक्षण अधिकाऱ्यांची भेट

दत्त साखर कारखाना परिसरातील साखर शाळेस गट शिक्षण अधिकाऱ्यांची भेट

शिरोळ / प्रतिनिधी

 

स्थलांतरित कामगारांच्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना मूलभूत सुविधा देणे संदर्भात पंचायत समिती शिरोळच्या गटशिक्षण अधिकारी भारती कोळी मॅडम यांनी दिली. मुलांना वर्ग खोली, बसायला बस्कर पट्ट्या, पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छतागृह व्यवस्था देण्यात आली आहे.

 

शिक्षणाच्या प्रवाहात मुलं आली पाहिजेत.शिकली पाहिजेत आणि टिकली पाहिजेत या धोरणानुसार मुलांना शिकवण्यासाठी कारखाना प्रशासनाने तीन स्वयंसेवक शिक्षकांची निवड केली आहे.आज साखर शाळेच्या मुलांना खाऊ वाटप करण्यासाठी इनरव्हील क्लब जयसिंगपूर हेरिटेज मार्फत सेक्रेटरी माधुरी शेडबाळे,

 

इंगळे मॅडम,गोंदकर मॅडम,अमित पाटील व कोरे सर यांनी साखर शाळेस भेट दिली.इंगळे मॅडम यांचा मुलगा आर्वी याचा आज पहिला वाढदिवसाच्या निमित्ताने लाडू, शेंगदाणे चिक्की यांचे वाटप करण्यात आले.तसेच मुलांना चित्रकला वही,रंगीत खडू व एक वही असे शैक्षणिक

 

साहित्य देण्यात आले.इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्यांचे स्वागत गटशिक्षणाधिकारी भारती कोळी मॅडम यांनी केले. त्यांनी साखर शाळेतील मुलांशी संवाद साधला.मुलांना शिकण्यास प्रोत्साहन दिले.रोज शाळेत येण्यासाठी आवाहन केले. केंद्रशाळा व कन्या दत्तनगर शाळा शालेय पोषण आहार देतात.तसेच शैक्षणिक

 

साहित्य ही साखरशाळेस देतात.ऊसतोड मजुरांच्या साखर शाळेस स्वतः गट शिक्षण अधिकारी भारती कोळी यांनी भेट देवून मुलांना मूलभूत सुविधा परिपूर्ण करणेबाबत कारखाना प्रशासनाशी चर्चा केली.

Spread the love
error: Content is protected !!