श्री दत्त मंदिर हरोली येथे श्रीदत्तजयंती उत्सवास प्रारंभ
प.पू. अनिलगिरी महाराज यांचे मार्गदर्शनाने व प.पू. श्री जिवनभारती महाराज यांचे आशिर्वादाने उद्या मंगळवार दि १९-१२-२०२३ ते बुधवार दि २७-१२-२३ पर्यंत श्री दत्त जयंती सोहळा श्री दत्त मंदिर क्रांतीनगर हरोली येथे होणार आहे.पहाटे ४.३० ते ६.३०- काकड आरती
सकाळी ९ ते दुपारी १२ पारायण सोहळा दुपारी १२ते १ – अभिषेक व पूजा सायं ६.३० ते ८.३०सांप्रदायिक भजन व आरती असे दैनंदिन कार्यक्रम असणार आहेत.
मंगळवार दि १९-१२-२०२३ रोजी सकाळी ८.१५ वाजता प.पू. श्री चैतन्य नारायण कुलकर्णी (मिरज) यांचे हस्ते ध्वजारोहण होईल सोमवार दि २५-१२-२३ रोजी माधुकरी (भिक्षेचा) कार्यक्रम दुपारी १२ वाजता होईल
मंगळवार दि.२६-१२-२३ रोजी दुपारी ३ वा. ह.भ.प. श्री विठ्ठल रघुनाथ सुरवंशी (मल्लेवाडी) यांचे श्रींच्या जन्मोत्सवाचे किर्तन होईल.सायं ५.०२ मि. श्रीं चा जन्मोत्सव साजरा करण्यात येईल.सायं ५.३० वा श्री संत गजानन महाराज भजनी मंडळ कोरोची यांचा भजन कार्यक्रम व रात्री ८ वा श्री रामानंद पंत भजनी मंडळ तारदाळ यांचा भजन कार्यक्रम होणार आहे.अन्नदान सेवा (महाप्रसाद) सायं ६ ते १० या वेळेत होईल.बुधवार दि २७-१२-२३रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प. श्री चंद्रकांत शंकर कुंभार महाराज यड्रावकर यांचे काल्याचे किर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होईल यावेळी प.पू. स्वामी महेशानंद महाराज व प.पू साध्वी योगिता चैतन्य महाराज (ऋषिकेश,उतराखंड) हे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत