सदलगा नगरपालिकेच्या पोटनिवडणूकीसाठी ९ उमेदवार रिंगणात

सदलगा नगरपालिकेच्या पोटनिवडणूकीसाठी ९ उमेदवार रिंगणात
लढत प्रभाग क्रमांक १५ व १६ मध्ये सरळ काँग्रेस विरुद्ध भाजप लढत
सदलगा  / शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम
चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरातील पोटनिवडणुकीसाठी आज नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत संपून एकूण 18 उमेदवारांपैकी नऊ उमेदवार रिंगणात राहिले असून उर्वरित ठिकाणी संमिश्र लढत दिसून येत आहे.सदलगा नगरपालिका प्रभाग क्रमांक ५,१२,१५ आणि १६  या चार प्रभागासाठी लागलेल्या पोट निवडणुकीत एकूण १८ इच्छुक उमेदवारांपैकी ९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेऊन उर्वरित उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील उमेदवारी निश्चित केली.छाननीमध्ये एकही नांव कमी झाले नव्हते. उमेदवारांना आज चिन्हांचे देखील वाटप करण्यात आले.
प्रभाग क्र.५ साठी लढणारे उमेदवार
१)अताउल्लाह अबूबकर मुजावर (काँग्रेस)
२) मोहसीन इक्बाल सनदी (अपक्ष)
३) मकानदार हुसेन दस्तगीर(अपक्ष)
प्रभाग ५ साठी नामनिर्देशन पत्र माघारी घेतलेले उमेदवार १) अमीर अबुबकर मुजावर (अपक्ष)
२) भरत मारुती हणबर(अपक्ष)
३) मिरजकर प्रदीप मार्तंड(अपक्ष)
प्रभाग क्र १२ साठी निवडणूक लढविणारे उमेदवार
१) बसवराज आण्णासाहेब गुंडकल्ले (काँग्रेस)
२) महांतेश बाळासाहेब देसाई (अपक्ष)
प्रभाग १२ साठी नाम निर्देशन पत्र माघारी घेतलेले उमेदवार
१) पाटील अभिजित दादासाहेब (अपक्ष)
२) सुकुमार आदप्पा गिजुने (अपक्ष)
३) महावीर आण्णासाहेब उदगावे (अपक्ष)
प्रभाग क्र १५ साठी निवडणूक लढविणारे उमेदवार
१) रिहाना अली सनदी (काँग्रेस)
 ३) मुजावर करिष्मा अमित (भाजप)
 प्रभाग १५ साठी नामनिर्देशन पत्र माघारी  घेतलेले उमेदवार
१) हसीना रफिक सनदी (अपक्ष)
प्रभाग क्र १६ साठी निवडणूक लढविणारे उमेदवार
१) शकुंतला जिन्नाप्पा कुंभार (काँग्रेस)
२) रशीया अल्ताप जमादार (भाजप)
प्रभाग १६ साठी माघार घेतलेले उमेदवार
१) शाराभी मक्तुम मुल्ला (अपक्ष)
२)श्रुती उमेश कुंभार (अपक्ष)
याप्रमाणे उमेदवारांची लढत होणार असून प्रत्यक्ष निवडणूक दिनांक २७ डिसेंबर रोजी आहे.आणि ३० डिसेंबर रोजी चिकोडी येथे मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी  सुभाष बजंत्री आणि साहाय्यक निवडणूक अधिकारी  सुरेश पुजारी यांनी आज प्रसार माध्यमांना दिली.
Spread the love
error: Content is protected !!