दत्त जयंतीनिमित्त कुरुंदवाड चिलखी विभाग येथे धार्मिक कार्यक्रम माचे आयोजन
कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड येथील चिलखी विभाग येथे शतक शतकोत्तर श्री दत्त मंदिर येथे शनिवार दि.२३ ते बुधवार दि.२७ डिसेंबर अखेर दत्त जयंती सोहळा होत आहे.यानिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत.मंगळवार दि २६ डिसेंबर रोजी सांय ७ वा.५ मी श्री दत्त जन्म सोहळा तर बुधवार दि.२७ सांगता भजन आणि महाप्रसाद होऊन जन्मोत्सवाची सांगता होणार आहे. अशी माहिती संयोजकांनी दिली.दरम्यान जन्मोत्सवानिमित्त दत्त मंदिरात भजन,आरती, पंचामृत अभिषेक,कीर्तने असे कार्यक्रम होणार आहेत.शनिवार दि २३ पासून नित्य कार्यक्रम -शनिवार दि.२३ रोजी सकाळी ९ वाजता ध्वजारोहण तर दुपारी ४ ते ६ गुरुमाऊली महिला भजनी मंडळ यांचा आणि ७ ते ८ श्री हरी भजनी मंडळ यांचे भजन तर रात्री ९ ते ११ मंगल जाधव सांगली यांचे किर्तन कार्यक्रम संपन्न झाला.तसेच रविवार दि २४ रोजी सकाळी ८ वाजता पूजा व आरती दु ४ ते ६ अक्कमहादेवी महिला भजनी मंडळ यांचे भजन तर सांय ७ वाजाता भक्तीसंगीत आणि रात्री ९ ते १२ ह भ प किशोर भाट यांचे किर्तन होणार आहे तसेच सोमवार दि २५ रोजी सकाळी 8 वाजता पूजा व आरती तसेच सांय ४ ते ६ श्री नामदेव मंदिर महिला भजनी मंडळ यांचे भजन तसेच श्री सांय ७ ते ८ अनिलकुमार चौगुले यांचे प्रवचन आणि रात्री ९ ते ११ श्री पंत भजनी मंडळ यांचा भजनाचा कर्यक्रम आयोजित करण्यात आल आहे.तसेच मंगळवार दि २६ रोजी सकाळी ८ वाजता पूजा व आरती त्याचबरोबर सकाळी १० वाजता श्री दत्त पादुकांवर सार्वजनिक महाअभिषेक तर सांय ५ ते ७ गुरू माऊली महिला भजनी मंडळ व श्री दत्त मंदिर चिलखी विभाग यांचा भजनाचा कार्यक्रम होणार असून सांय ७ वाजून ५ मी. श्री दत्त जन्मसोहळा साजरा होणार आहे.तर रात्री १० वाजले पासुन कपिल तराळ व किशोर भाट यांचे संगीत जागरण भजन होणार आहे.तर बुधवार दि २७ रोजी सकाळी ९ ते १२ पर्यत मांगुर येथील श्री दत्तपंथी भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होत असून दुपारी १२ वाजले पासून महाप्रसाद होऊन जन्मोत्सवाची सांगता होणार आहे.अशी माहिती संयोजकांनी दिली.