आधुनिक युगात शिक्षणाचे महत्त्व जाणून घ्या – माजी आम.काकासाहेब पाटील
बोरगाव येथे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
बोरगांव / प्रतिनिधी
शिक्षणाशिवाय जीवन नाही.अक्षराचे ज्ञान हे बालपणापासून घेऊन शिक्षण हे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आज सर्वांनी प्रयत्न केली पाहिजे.मराठा समाजाच्या युवक युतींमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आज समाजाचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.अनेक युवक युवती उच्चपदावर पोहोचण्यासाठी सर्वांचे मोठे योगदान आहे.मराठा व मराठी यांच्यातील दुरावा दूर करण्यासाठी ही प्रयत्न चालू आहे.आधुनिक युगात शिक्षणाचे महत्त्व सर्वांनी जाणून घेतले पाहिजे.सीमा भागातील मराठा समाजाच्या उन्नतीसाठी मी प्रयत्न करीत राहणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.बोरगाव येथे नरसू गोटखिंडे यांच्या घरी आयोजित मराठा समाजाच्या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी काकासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी समाजाला मार्गदर्शन करताना काकासाहेब पाटील यांनी,मराठा समाजातील त्रुटी दूर करून समाज एक संघ होण्यासाठी सर्वांचे प्रयत्न असणे गरजेचे आहे. समाजातील युवक युवतींना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले पाहिजे.कारण आज शिक्षण असेल तर आपण काहीही साध्य करू शकतो .समाजातील समस्या,अनक्षरता, अंधश्रद्धा दूर होऊन उत्तम समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया नाविन्यता आणि संशोधन हे आपले नैतिक कर्तव्य समजून सर्वांनी प्रयत्न केले तर नक्कीच समाजात एक वेगळे स्थान आपण निर्माण करू शकतो असे शेवटी माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी म्हटले.
याप्रसंगी मराठा समाजाची मुलगी पूर्वा निकम यांना पीएचडी मिळाल्याबद्दल,मोहन पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल, व शिवानी दबडे ही मुलगी बीएससी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल समस्त मराठा समाजाच्या वतीने काकासाहेब पाटील यांनी त्यांचा सत्कार केला व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिली.याप्रसंगी मलिकवाडचे बाळासो पाटील,शंकर दादा पाटील ,अनिल माने,सोनू कदम,प्रकाश कदम,अशोक हेगडे,विलास लोखंडे,तानाजी बेलवडे,संजय चौगुले,जितेंद्र चेंडके,शिवाजी निकम,वरून कुलकर्णी ,रामचंद्र पाटील यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.शेवटी ओमकार गोटखिंडे यांनी सर्वांचे आभार मानले.