टाकळीवाडी / प्रतिनिधी
दत्तवाड केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा विद्या मंदिर टाकळीवाडी येथे दि. १४व१५ डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाल्या.
स्पर्धेचे उद्घाटन सरपंच मंगल बिरणगे व व्यवस्थापन समिती अध्यक्षा शुभांगी खोत यांचे हस्ते संपन्न झाले.तर बक्षिस वितरण समारंभ श्री गुरूदत्त शुगर्स टाकळीवाडीचे चिफ एक्झिक्युटीव्ह राहूल दादा घाटगे यांचे हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे,उपसरपंच प्रमिला आवटी,केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे,केंदबा कांबळे, खुशाल कांबळे,तुकाराम चिगरे,बाबासाहेब वनकोरे,भरमू बदामे,बाजीराव गोरे,तुकाराम बदामे,भरत निर्मळे,कृष्णा कोळी,संतोष चिगरे,रमेश निर्मळे उपस्थित होते.तर सुर्यकांत बदामे,भरत निर्मळ,प्रज्वल कोळी,डॉ.विजय पाटील,डॉ.दशरथ निर्मळे,निशांत गोरे,गणेश गोरे,संजय पाटील, छाया कांबळे,छत्रपती संभाजीराजे पतसंस्थेचे विशेष सहकार्य लाभले.
सांघिक स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -कबड्डी (वरिष्ठ गट -मुले) -विजेता -नवे दानवाड तर उपविजेता -टाकळीवाडी.(मुली -विजेता) -कन्या हेरवाड, उपविजेता -कन्या घोसरवाड
कबड्डी -(कनिष्ठ गट मुले )- विजेता -टाकळीवाडी, उपविजेता -कुमार हेरवाड तर मुलींमध्ये विजेता -कन्या दत्तवाड,उपविजेता -टाकळीवाडी.
खो -खो( वरिष्ठ गट )मुले -विजेता -टाकळीवाडी, उपविजेता -कुमार घोसरवाड. मुलींमध्ये विजेता -टाकळीवाडी उपविजेता -कन्या घोसरवाड.
खो -खो (कनिष्ठ गट )- मुले विजेता -कुमार हेरवाड उपविजेता -नवे दानवाड तर मुलींमध्ये विजेता -टाकळीवाडी उपविजेता कन्या दत्तवाड.
रिले ४x१०० मी.वरिष्ठ गट विजेता-टाकळीवाडी,उपविजेता -नवे दानवाड.
वैयक्तिक स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे -धावणे (कनिष्ठ गट) ५० मी.- (मुले) प्रथम -आर्यन अनिल कांबळे,द्वितीय -गणेश सुभाष केंगारे,तृतीय – वैभव अनिल हळाळे तर (मुली) -प्रथम अंजली विठ्ठल निर्मळे,द्वितीय – आदिती तातोबा चौगुले,तृतीय -स्नेहा सागर आडे.
१०० मी.धावणे (कनिष्ठ गट)मुले -प्रथम -सक्षम शिवतेज कांबळे,द्वितीय – कृष्णा सुखदेव खोत,तृतीय -वैभव अनिल हळाळे.तर मुलींमध्ये प्रथम -आदिती तातोबा चौगुले,द्वितीय -रिया सुरेश व्हुन्नरगे,तृतीय -आलिशा मुसा द्वारखान.
वरीष्ठ गट -१०० मी.धावणे मुले -प्रथम सोहम उमेश निर्मळे, द्वितीय -अलंकार आण्णाप्पा पुजारी,तृतीय -प्रथमेश श्रीशैल कांबळे.तर मुलीमध्ये प्रथम -गायत्री राजेंद्र तराळ,द्वितीय -अल्फिया लियाकत चाँदखान, तृतीय -श्रेया संजय शेडबाळे.
२०० मी.धावणे(वरिष्ठ गट) -मुले प्रथम -वेदांत राहूल वाळके, द्वितीय -विश्वजित जगदिश राजपूत,तृतीय -साहिल राजू ढोणे तर मुलींमध्ये प्रथम- रितीका महावीर सदलगे,द्वितीय -गौरी संजय आलासे,तृतीय -सबा दावल लाडखान.
४०० मी.धावणे(वरिष्ठ गट)- मुले प्रथम -राजरत्न तात्यासो कांबळे,द्वितीय -संस्कार संदिप कांबळे,तृतीय -नवमान मुस्ताक कुऱ्हाडे तर मुलींमध्ये प्रथम – गायत्री राजेंद्र तराळ,द्वितीय -सुप्रिता भूपाल पट्टणकुडे तर तृतीय- श्रावणी दिलीप कांबळे.
६०० मी. धावणे(वरिष्ठ गट) मुले प्रथम -मारुती सुभाष खोत, द्वितीय- वेदांत राहूल वाळके, तृतीय -सार्थक सिद्राम नाईकवाडे. तर मुलींमध्ये प्रथम -अनुपमा अरविंद पाटील, द्वितीय -श्रध्दा संतोष गावडे,तृतीय- अनुष्का पांडुरंग नाईकवाडे.
लांब उडी (वरिष्ठ गट ) मुले -सोहम उमेश निर्मळे, उपविजेता -मारूती सुभाष खोत तर मुलीमध्ये प्रथम – विजेता -गायत्री राजेंद्र तराळ, उपविजेता -श्रेया संजय शेडबाळे. (कनिष्ठ गट ) – मुले -विजेता -सम्राट सूरज कांबळे,उपविजेता -स्नेहदिप सतिश निर्मळे तर मुलींमध्ये विजेता -अनुष्का पांडुरंग उन्हाळे तर उपविजेता -प्रतिक्षा लक्ष्मण माळी.
उंच उडी -(वरिष्ठ गट) मुले -विजेता -सुशांत अनिल अंबुजे उपविजेता -सोहम उमेश निर्मळे तर ( उंच उडी -कनिष्ठ गट) मुले -सोहम बंडू वडर,उपविजेता -आशुतोष महेश अंबुपे तर मुलींमध्ये विजेता – अनुष्का पांडुरंग उन्हाळे,उपविजेता -आलिया मुसा लाडखान.
कुस्ती निकाल पुढील प्रमाणे -२५ कि.ग्रॅ. मुले विजेता – आशिष रामदास बिरणगे, उपविजेता -अरिहंत शितल मलिकवाडे.तर मुलींमध्ये विजेता -सिफा रसूल जमादार, उपविजेता -प्रतिक्षा लक्ष्मण माळी.
३० कि.ग्रॅ.मुले – विजेता -सक्षम दिग्विजय कांबळे, उपविजेता -दर्शन सिद्राम नाईकवाडे तर मुलींमध्ये विजेता – भक्ती आण्णाप्पा पुजारी उपविजेता -धनश्री अनिल भोकरे.
३५ कि.ग्रॅ. (मुले) – विजेता -अलंकार आण्णाप्पा पुजारी,उपविजेता – अभिजीत संभाजी शिंदे तर मुलींमध्ये विजेता -रितिका महावीर सदलगे,उपविजेता -समृध्दी प्रफुल्ल वाळके.
४० कि.ग्रॅ. मुले विजेता – समर्थ सिध्दा पुजारी,उपविजेता -आर्यन राजू बदामे तर मुलींमध्ये विजेता -दिव्या संतोष कोळी,उपविजेता – स्वाती सुखदेव खोत.
४५ कि.ग्रॅ. मुले -विजेता -श्रवण सोमलिंग अकिवाटे,उपविजेता – आदर्श सयाजी चव्हाण. मुलींमध्ये विजेता -गायत्री राजेंद्र तराळ तर उपविजेता -लिबा आक्रम मुजावर.
सदर केंद्रस्तरिय स्पर्धेसाठी गट शिक्षण अधिकारी भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे यांचे मार्गदर्शन लाभले तर केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे,रमेश शंकर कोळी,केंद्र मुख्याध्यापक राजू जुगळे,क्रीडा विभाग प्रमुख भालचंद्र खोत,दत्तवाड केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक,ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.