भानामतीच सावट ‘त्या’ हाप स्पीच क्रिकेट स्पर्धेवर,खेळाडूंनी घेतली धास्ती

भानामतीच सावट ‘त्या’ हाप स्पीच क्रिकेट स्पर्धेवर, खेळाडूंनी घेतली धास्ती
शिरोळ / प्रतिनिधी
करणी,भूतबाधा,भानामती आज पर्यत भाऊ बंधकीत, निवडणूकीत केल्याचे पाहिलं व ऐकलं होतं.पण आता मात्र चक्क हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धेत आपलेच वर्चस्व राहावे याकरिता विरोधी संघाच्या नावाच्या व खेळाडूंच्या चिठ्ठ्या लिहून त्या चिठ्ठ्या काळया बाहुलीच्या पोटात टाचणीने टोचून  करणी व भानामती करणाऱ्या अघोरी कृत्याचा धक्कादायक प्रकार शिरोळ स्मशानभूमीत समोर आला.यांची शिरोळ शहरासह जिल्ह्यात चांगलीच रंगली.दरम्यान या भानमतीचा परिणाम म्हणजे ‘त्या’ हाप स्पीच क्रिकेट वर दिसून आला.या स्पर्धेतील अनेक मातब्बर संघ स्पर्धेतून बाहेर गेले तर अनेक खेळाडू शुन्हावर बाद झाले.त्यामुळे अनेक संघांनी व खेळाडूंनी या भानमतीची धास्ती घेतली आहे.खर तर हा अंधश्रध्येचा भाग असला तरी असल्या प्रकाराने एक वेगळं वळण लागत आहे असे ही बोलले जात आहे.काही महिन्यापूर्वी गणेशवाडी येथील स्मशानभूमीत असाच प्रकारे हळद कुंकू लिंबूने मांडून पूजा करण्यात आली होती.या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली होती.असा प्रकार शिरोळ येथील स्मशानभूमीत दोन दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीने हळदी कुंकू,सुपारी व अन्य साहित्य आणि काळ्या बाहुलीच्या पोटात घुसवलेल्या चिठ्ठ्या काढून उघडून पाहिले असता त्या ठिकाणी चार चिठ्ठ्यामध्ये हाफ पीच क्रिकेट स्पर्धेत सहभागी असणाऱ्या क्रिकेट संघाची व खेळाडूंची नावे मिळून आली त्यामुळे हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धेतील वर्चस्वासाठी हा प्रकार अज्ञातानी केल्याचे स्पष्ट झाले.मात्र या घटनेने अजूनही पुरोगामी म्हणवणाऱ्या या महाराष्ट्रात अंधश्रध्देचा प्रचंड पगडा आज ही आहे. सरकारने जादूटोणा विरोधी कायदा कडक करावा जने करून असा प्रकाराला आळा बसेल.
Spread the love
error: Content is protected !!