मा.राजदूत ज्ञानेश्वर मुळे चांगुलपणाची चळवळसाठी सहकार्य राहील – मा.उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
शिरोळ / प्रतिनिधी
भारताचे माजी राजदूत ज्ञानेश्वर मुळे पुढाकाराने नवी दिल्ली येथे देशातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महान व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरव करून त्यांना मोमेंट ऑफ पॉझिटिव्ह ही संस्था प्रोत्साहन देत आहे या कार्यात आपण सर्वतोपरी सहकार्य करू तसेच ज्ञानेश्वर मुळे यांनी सुरू केलेले हे कार्य देशभर पोहचावे अशी अपेक्षा भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली.माजी राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांनी सुरू केलेल्या मुव्हमेंट ऑफ पॉझिटिव्ह (चांगुलपणाची चळवळ) या संस्थेच्या वतीने देशातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविले जाते.या पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे बोलत होते.प्रारंभी उपस्थितांच स्वागत या संस्थेचे संस्थापक भारताचे माजी राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांनी करून कार्यक्रमाचा हेतू सांगितला.यावेळी भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू,कारगिल युद्धामध्ये अंगावर सात गोळ्या झेलून देखील शत्रूचा नायनाट करणारे परमवीरचक्र प्राप्त मेजर योगेंद्रसिंह यादव, भारताचे मत्स्य व दूग्ध राज्यमंत्री रूपाला,भारत सरकार डेप्युटी एज्युकेशनचे सेक्रेटरी आनंद पाटील,ड्रमवादक पद्मश्री अवॉर्ड प्राप्त शिवामनी,भारतामधील प्रसिद्ध हॉटेल मॅरॉट इंटरनॅशनलच्या प्रमुख डॉ.रंजू झा अलेक्स, यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.या कार्यक्रमास कोल्हापूर जय शिवराय संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पाटील,संघटनेचे प्रमुख शिवाजीराव माने,शिरोळ तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.