कोथळी- समडोळी बंधाऱ्याची पडझड: शेतकरी संकटात
बंधारा नुतनीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची गरज
जयसिंगपूर / प्रतिनिधी
वारणा नदीवरील कोथळी- समडोळी बंधार्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.पीलरची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने बंधाराची अखेर्याची घटका मोजत आहे. यातच पाटबंधारे विभाग व प्रशासन बंधाऱा नुतनीकरण करण्यासाठी वेळीच ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.कोथळी-समडोळी बंधारा हा
१९८० साली बांधण्यात आला आहे.कोल्हापूर- सांगली जिल्ह्याच्या सीमेलगत वारणा नदीवर हा बंधारा आहे. पाणी साठवणुकीमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील समडोळी कवठेपिरान,दुधगांवसह,कोल्हापूर जिल्ह्यातील कोथळी दानोळी,निमशिरगांव,जैनापुर,कुंभोज, हिंगणगावसह तीसभर गावांतील शेतकरी व ग्रामस्थांना हा बंधारा संजीवनी मानला जातो.गेले ४२ वर्षात बंधाऱ्याने लहान मोठ्या महापुराच्या तडाख्यात तग धरला आहे.पण आता मात्र बंधार्याची वारंवार पडझडी मुळे बंधारा अखेरचा श्वास घेत आहे.सध्या तीन पिल्लरची डागडुजी करून ही मोठ्याप्रमाणात पडझड झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची मोठी गळती होत आहे. शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होणार आहे.पाण्या वाचुन शेतकरी व नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी लवकरात लवकर या पर्यायी बंधार्याची मागणी नागरीकामधून होतं आहे.कोथळी बंधाऱ्यातील पाण्यावर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सुमारे ३० गावे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी या बंधाऱ्यावर अवलंबून आहेत.वारणा नदीत पाणीसाठा न झाल्याने अनेक शेतीपंप धारकांना फटका बसला आहे. शेतीला पाणीपुरवठा खंडित होण्याची वाट प्रशासन पाहत आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रतिक्रिया —
बंधाऱ्याची सध्याची परिस्थिती पाहता,भविष्यात शेतकरी व नागरिकांच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होवू शकतो साठी बंधारा नुतनीकरणासाठी पर्यायी उपाययोजना करण्याची गरज आहे.
― जयदीप धनाजीराव थोरात सामाजिक कार्यकर्ते, दानोळी