केंद्रशाळा रूकडी अंतर्गत विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

केंद्रशाळा रूकडी अंतर्गत विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

रुकडी / प्रतिनिधी

केंद्रशाळा रुकडी अंतर्गत क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा केंद्रीय प्राथमिक शाळा रुकडी येथे संपन्न झाल्या.या स्पर्धांचे बक्षीस वितरण हातकणंगले तालुक्याच्या शिक्षण विस्तार अधिकारी-नम्रता गुरसाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुकडी केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय शशिकांत पाटील-अध्यक्ष शिक्षक संघ हातकणंगले हे होते.तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रूकडी गावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य शितल खोत,राम चट्टे व बी.आर.सी. हातकणंगलेच्या माने उपस्थित होते.स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.क्रीडा विभाग प्रमुख जहीर जमादार सर मुख्याध्यापक-कन्या वि.म. साजणी तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख सुरेश जाधव मुख्याध्यापक-वि.मं.अतिग्रे यांनी या स्पर्धांचे अतिशय उत्कृष्ट असे नियोजन केले होते.या स्पर्धांसाठी संजय भिकू देशमुख मुख्याध्यापक,कुमार वि. मं.साजणी व सुनिता महावीर चौगुले मुख्याध्यापिका वि. मं.मुडशिंगी यांचे विशेष सहकार्य लाभले.स्पर्धेसाठी लागणारी सर्व शिल्ड्स संजय देशमुख व सुनीता चौगुले यांनी दिली.रेहाना मकानदार संचालिका-शिव-शाहू पतसंस्था हातकणंगले यांनी खेळाडूंच्या खाऊची सोय केली.सर्व संघटना अध्यक्षांनी प्रमाणपत्रांची छपाई करून दिली.या कार्यक्रमासाठी सचिन कोल्हापुरे-अध्यक्ष शिक्षक समिती हातकणंगले,दिलीप कांबळे-अध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना हातकणंगले,संभाजी सिद- माजी संचालक प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूर,सोनाली परीट महिलाध्यक्षा शिक्षक संघ हातकणंगले,एस.आय. पाटील,सायरा तांबोळी,प्रदीप माने,उमेश हरोलीकर,नितीन कमते तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक,मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.या स्पर्धेसाठी खा.बाळासाहेब माने शिक्षण संकुल,महात्मा गांधी हायस्कूल रुकडी,ए.पी.मगदूम हायस्कूल माणगाव,पायोनियर हायस्कूल अतिग्रे,डी.एड.कॉलेज रूकडीच्या शिक्षकांनी पंच म्हणून काम पाहिले.या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती रुकडी व रुकडी केंद्रातील सर्व शाळांचे बहुमोल असे सहकार्य लाभले.

Spread the love
error: Content is protected !!