महाराष्ट्र महिला केसरी पै अमृता पुजारीचा होणार शिरोळकरांच्या वतीने रविवारी नागरी सत्कार
शिरोळ : प्रतिनिधी
शिरोळची सुकन्या पै अमृता शशिकांत पुजारी हिने चंद्रपूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्र महिला केसरी किताब मिळवून शिरोळ शहराचे नाव देशपातळीवर उज्वल केल्याबद्दल पै अमृता पुजारी हिचा शिरोळ नगरपालिका व समस्त नागरिक यांच्यावतीने भव्य नागरी सत्कार रविवार२४ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवाजी चौकात करण्यात येणार आहे चांदीची गदा मानपत्र सन्मान चिन्ह एक वर्षाची विमा पॉलिसी देऊन गौरवण्यात येणार आहे असा निर्णय नगरपालिकेच्या दलितमित्र दिनकररावजी यादव सभागृहात झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला
महाराष्ट्र केसरी पै अमृता पुजारी हिचा सत्कार करण्यासाठी नगरपालिकेच्या दलितमित्र दिनकररावजी यादव सभागृहात आजी-माजी लोकप्रतिनिधी विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळाचे कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई हे होते
बैठकीच्या प्रारंभी युवानेते पृथ्वीराज यादव आणि सर्वांचे स्वागत करून महाराष्ट्र केसरी पै अमृता पुजारीच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेबद्दल सविस्तर माहिती दिली तर पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी हा नागरी सत्कार समारंभ नगरपालिका व शहरवासीयांच्या वतीने भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे त्याकरता नगरपालिकेचे सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही दिली
२४ डिसेंबर रोजी पै अमृता पुजारी हिचे शहरात आगमन झाल्यानंतर शिरोळ पंचायत समिती पासून शहरातील विविध भागातून तिची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे हालगी झांज पथक धनगरी ढोल लेझीम या पारंपरिक वाद्यासह हत्ती घोडे विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी एनसीसी कॅडेट प्रमुख मान्यवर या मिरवणुकीमध्ये सामील होणार आहेत शिवाय तिने कुस्ती क्षेत्रामध्ये केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल नगरपालिका व शिरोळ शहरवासीयांच्या वतीने शिवाजी चौकात नागरी सत्कार करण्यात येणार आहे शिरोळ वासियांच्या वतीने चांदीची गदा मानपत्र सन्मान चिन्ह विमा पॉलिसी देऊन गौरवण्यात येणार आहे असे सर्वानुमते ठरले या बैठकीस माजी आमदार उल्हास पाटील माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील दलितमित्र डॉ अशोकराव माने माजी सरपंच गजानन संकपाळ बी जी माने दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरंदेकर माजी नगरसेवक डॉ अरविंद माने पंडित काळे प्रकाश गावडे राजाराम कोळी इम्रान आत्तार योगेश पुजारी शरद उर्फ बापूसो मोरे रावसाहेब पाटील मलिकवाडे भाजपा तालुकाध्यक्ष मुकुंद उर्फ बाळासो गावडे विजय आरगे श्रीकांत गावडे किरण पाटील कणंगलेकर रुपेश मोरे देवाप्पा दत्तात्रय पुजारी बबन पुजारी शिवाजी पुजारी बजरंग वंटे सामाजिक कार्यकर्ते अमरसिंह शिंदे सुरज कांबळे जनार्दन कांबळे प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. दगडू माने बाळासाहेब माळी मदन गावडे सुरेश कांबळे दत्तात्रय खडके अण्णासो पुजारी शशिकांत पुजारी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आजी-माजी लोकप्रतिनिधी शिरोळ तालुका कुस्तीगीर परिषदेचे प्रमुख पदाधिकारी सदस्य शहरातील पैलवान तरुण मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह शिरोळकर नागरिक मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते या बैठकीत सत्कार समारंभ व मिरवणुकीची रूपरेषा प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करणे यासह विविध कामांची जबाबदारी प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आली तसेच अनेकांनी या समारंभासाठी अर्थसहाय्य देण्यासाठी देणगी जाहीर केली.शिरोळचे नाव उज्वल करणाऱ्या महाराष्ट्र केसरी पै अमृता पुजारी हिचा स्वागत व सत्कार समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे