‘धक्कादायक’ प्रकार शिरोळच्या स्मशानभूमीत लिंबू,काळ्या भावल्याची अघोरी पूजा 

स्मशानभूमीत करणी की भानामातीचा प्रकार

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ स्मशानभूमीत एक अघोरी कृत्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अज्ञात व्यक्तीने कुंकू,लिंबू आणि काळ्या भावल्या स्मशानभूमीत पुजल्या असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.स्मशानभूमीत कुणी आणि का ? असा प्रकार केला याबाबत कुठलीच माहिती अद्याप समोर आली नसली तरी या घटनेने नागरिक चांगलेच धास्तावले आहे.हा प्रकार रविवारी सकाळी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.  स्मशानभूमीत एकच बघ्यांची गर्दी झाली होती. करणी की भानामातीचा प्रकार यावर तर्क वितर्क लढवले जात आहेत.या घटनेने अजूनही पुरोगामी म्हणवणाऱ्या या महाराष्ट्रात अंधश्रध्देचा प्रचंड पगडा असल्याचं पाहायला मिळत आहे.राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असताना अजून जनसामान्यांपर्यंत हा कायदा पोहचवण्यात राज्य सरकार अपयशी ठरताना दिसत आहे.

Spread the love
error: Content is protected !!