अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे जेलभरो आंदोलन

इचलकरंजी / प्रतिनिधी
अंगणवाडी सेविकांना २६ हजार आणि मदतनीसांना १८ हजार रुपये पगार,महागाई भत्ता व मानधनातील वाढ मिळावी यासह विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून सुरु असलेल्या आंदोलन अंतर्गत इचलकरंजीत
कॉ.जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो  आंदोलन करण्यात आले.यावेळी पोलिस आणि आंदोलक यांच्यात वाद झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.  राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी

बेमुदत संपावर आहेत.आंदोलन सुरु  असतानाही राज्य शासनाकडून त्याची साधी दखलही घेतली नसल्याच्या निषेधार्थ कॉ.जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहर व परिसरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत जेलभरो

 

आंदोलन केले.अनेक वर्षे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात सातत्याने शासन दरबारी प्रयत्न केले जात आहेत.या संदर्भात शासनाने तातडीने बैठक घेऊन प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी,अशी मागणी यावेळी कोल्हापूर जिल्हा

 

अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या कॉ.जयश्री पाटील यांनी केली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.आंदोलन दरम्यान काही आंदोलनकर्त्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.यावेळी अनिकेत पाटील,

 

डॉ.नम्रता पाटील, शोभा भंडारे,विद्या कांबळे,शमा पठाण,सुरेखा कांबळे आदींसह अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.

Spread the love
error: Content is protected !!