सदलगा नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी १८ अर्ज दाखल,पोटनिवडणुकीची रंगत वाढली.
सदलगा शहरात निवडणुकीचे वारे
सदलगा शहर प्रतिनिधी / अण्णासाहेब कदम
सदलगा नगरपालिका प्रभाग क्रमांक 5 ,12 ,15 आणि 16 मधील पक्षांतर बंदी कायद्याच्या उल्लंघनामुळे अपात्र झालेल्या चार प्रभागांमध्ये पोट निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी 18 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले.त्यात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार 04 भाजपचे अधिकृत उमेदवार 02 उर्वरित 12 अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.असे एकूण 18 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.प्रभाग क्रमांक पाच साठी सदलगा शहरातील सर्वात जास्त म्हणजे सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
1) आत्ताउल्ला अबूबकर मुजावर (काँग्रेस)
2) अमीर अबूबकर मुजावर (अपक्ष)
3) मोहसिन इकबाल सनदी (अपक्ष)
4) भरत मारुती हनबर (अपक्ष)
5) मकानदार हुसेन दस्तगीर (अपक्ष)
6) मिरजकर प्रदीप मार्तंड (अपक्ष)
प्रभाग क्रमांक बारा साठी
1) बसवराज अण्णासाहेब गुंडकल्ले (काँग्रेस)
2) महावीर अण्णासाहेब उदगावे (अपक्ष)
3) महांतेश बाळासाब देसाई (अपक्ष)
4) पाटील अभिजीत दादासाब (अपक्ष)
5) सुकुमार आदप्पा गिजुने (अपक्ष)
प्रभाग क्रमांक पंधरा साठी
1) रिहाना ईलायी सनदी (काँग्रेस)
2) हसीना रफिक सनदी (अपक्ष)
3) मुजावर करिष्मा अमित (भाजपा)
प्रभाग क्रमांक 16 साठी
1) शकुंतला जिन्नप्पा कुंभार (काँग्रेस)
2) शाराभी मक्तुम मुल्ला (अपक्ष)
3) श्रुती उमेश कुंभार (अपक्ष)
4) रजिया अल्ताफ जमादार (भाजपा)
याप्रमाणे एकूण चार जागेसाठी 18 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत शनिवार दिनांक 16 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी असून अर्ज मागे घेण्याची मुदत 18 डिसेंबर पर्यंत असून 27 डिसेंबर रोजी मतदान व 30 डिसेंबर रोजी चिकोडी येथे मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून श्री सुभाष बजंत्री आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून श्री सुरेश पुजारी यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असे सध्या तरी दिसत आहे.