सांगली जिल्ह्यातील डाॅक्टराची मौजे वडगाव गावच्या हद्दीतील गळपास लावुन घेवून आत्महत्या
मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
सांगली जिल्ह्यातील डाॅक्टराची मौजे वडगाव गावच्या हद्दीतील पाझर तलाव झाडीत गळफास लावून घेवून आत्महत्या मृतदेह सडलेल्या आवस्थेत आढळून आला ही आत्महत्या कि घातपात यावरून परिसरात उलटसुलट चर्चा सुरू
पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार मयताचे नाव डाॅ. संतोष जगन्नाथ ढोले वय 41 रा. धुळगाव ता.कवठेमहाकाळ जि सांगली. यानी मौजे वडगाव ता हातकणंगले येथील पाझर तलावाशेजारी असणाऱ्या गायराण गट नं 507 मधील झाडीतील झाडास प्लस्टीक दोरीचा गळफास लावून घेवून आत्महत्या केली असल्याची घटना जळन ( सरफण ) आणण्यासाठी गेलेल्या महिलांच्या पुर्णपणे सडलेल्या अवस्थेत निर्दशनास आल्याने त्यानी गावचे पोलिस पाटील याना माहिती देताच पोलिस पाटील यानी घटनास्थळी धाव घेवून खात्री करून घेत शिरोली पोलिसांना या बाबतची माहिती दिली पोलिसानी घटनास्थळी येवून मृतदेहाची झडती घेतली असता ढोले यांच्या जवळ त्यांची आधार कार्ड , धन्वंतरी हेल्थ केअर सेंटर इस्लामपूरचे आय कार्ड सापडले . डाॅ ढोले गेली दहा वर्षे घरच्यांपासून वेगळे राहत होते .मौजे वडगाव पाझर तलावाशेजारी असणार्या 507 गटामध्ये घनदाट झाडी ही गावापासून तीन चार कि मी अंतरावर असल्याने त्या ठिकाणी लोकांची वर्दळ किंचीत होत असे पण आज गावातील काही महिला सरफण आणण्यासाठी गेल्यावर परिसरात दुर्गंधी येत होती हे पाहणास गेल्यावर त्याना मृतदेह सडलेल्या अवस्थेत दिसला ही आत्महत्या कि घातपात यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे . या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे