अब्दूललाट / प्रतिनिधी
अब्दुललाट मधील गुरुकुल शिक्षण समूहाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आज संपन्न झाला.संस्थेचे संस्थापक गणेश नायकुडे,उपाध्यक्ष सौ.नविता नायकुडे, मुख्याध्यापिका सौ.बालिका पाटील व सौ.रेवती मगदूम यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना श्री गणेश नायकुडे म्हणाले,जीवनात यशस्वी होण्यासाठी व उत्तम व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे.या वर्षाचा “बेस्ट हाऊस इन स्पोर्ट्स” हा अवॉर्ड गुरुकुल विद्यालयाच्या केंब्रिज हाऊस ला व तर गुरुकुल इंग्लिश मेडीयम स्कुलच्या हॉवर्ड हाऊसला मिळाला .तसेच गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थी कु. पियुष हणमंत पाटील व विद्यार्थिनी कु.स्वरदा जितेंद्र अनुजे यांना तर गुरुकुल विद्यालयामधील विद्यार्थी कु.करण अरविंद गायकवाड व विद्यार्थिनी कु.संस्कृती शंकर पुजारी यांना खेळामधील विशेष कामगिरीबद्दल बेस्ट स्पोर्ट्समन या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक श्री गणेश नायकुडे , उपाध्यक्ष सौ.नविता नायकुडे,मुख्याध्यापिका सौ.बालिका पाटील व सौ.रेवती मगदूम सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.