नांदणी / प्रतिनिधी
स्व.आपगोंडा पाटील स्मरणार्थ पुरस्कार जाहिर
डॉ.अशोकराव माने आदर्श समाजसेवक तर भूपाल शंभूशेटे कृषिभूषण पुरस्कार
नांदणी / प्रतिनिधी
येथील आदर्श समाजसेवक स्व.आपगोडा कलगोंडा पाटील यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार-२०२३ दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ तालुका मागासवर्गीय सह.सूतगिरणीचे संस्थापक चेअरमन दलितमित्र डॉ.अशोकराव कोंडिबा माने यांना तर नांदणी कृषिभूषण पुरस्कार २०२३ प्रगतीशील शेतकरी भूपाल बाबू शंभूशेटे यांना जाहिर झाले आहेत. अशी माहिती आपगोंडा कलगोंडा पाटील स्मृती संयोजन समितीचे अॅड. मनोज पाटील,बापू आंबी,रामगोंडा पाटील,अनिल धुळासावंत,पोपट बोरगावे,वैभव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.समन्वयवादी समाजकारण,विकासाभिमुख राजकारण,सर्वसमावेशक धर्मनिरपेक्षता,चारित्र्यसंपन्न नेतृत्व आणि निस्वार्थी कर्तृत्व यांचा आपल्या कृतीतून आदर्श घालून देणाऱ्या स्व. आपगोडा कलगोंडा पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी व विकासासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या समाजसेवकाचा आदर्श समाजसेवक पुरस्कार व कृषिक्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकरी राजास कृषि भूषण पुरस्कार, देऊन गौरवण्यात येते.डॉ.अशोकराव माने यांच्या आदर्श समाजकार्याची व भूपाल शंभूशेटे यांच्या कृषिक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हे पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत.यावेळी सेवानिवृत्त पशुधन पर्यवेक्षक डॉ.भीमराव गणपतराव पाटणकर यांच्या पशुधन संवर्धनाच्या उल्लेखनिय कार्याबदद्ल त्यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.युवा व्याख्याते लेखक विचारवंत व साहित्यिक प्रा.गणेश शिंदे यांच्या शुभहस्ते,नेमिनाथ जुगळे (गुरुजी) यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर,मा.खासदार राजू शेट्टी,मा. आ. उल्हास पाटील,गणपतराव (दादा) पाटील व नांदणीच्या सरपंच सौ.संगीता तगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि.२९ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नांदणी हायस्कूल नांदणी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.