नाशिक येथे संपन्न झालेल्या १७ वर्षांखालील महाराष्ट्र राज्य खो-खो संघात कुमारी राजराजेश्वरी ज्ञानेश्वर आमणे इयत्ता 9 वी अ व कुमार राजू दिपक पाटील इयत्ता 9 वी ब यांनी शालेय राष्ट्रीय खो खो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले.तसेच डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये ओम गणेश मगदूम ९ वी ब याने उज्ज्वल यश मिळवले.या निमित्ताने येथील ना. बा.एज्यु केशन सोसायटी संचलित गोविंदराव हायस्कुल व ज्युनियर कॉलेज मध्ये सत्कार सभारंभ संपन्न झाला.या सत्कार सभारंभाच्या वेळी प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एस. चिंचवाडे यांनी प्रास्तविक केले व प्रास्ताविकामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवासजी बोहरा (शेठजी) यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून गोविंदराव हायस्कूलच्या शिरपेचात सुवर्ण तुरा रोवला आहे.असे उद्गार काढून प्रशालेने भविष्यात देखील अशीच कामगिरी करावी असे मनोगत व्यक्त केले.तसेच ओम दिनेश मगदूम इयत्ता 9 वी याविद्यार्थ्यांने डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये उत्तम रित्या प्राविण्य मिळवले.त्याबद्दल देखील कौतुक केले.या विद्यार्थ्यांना संस्थेचे पदाधिकारी यांचे प्रोत्साहन मिळाले.तर प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एस.चिंचवाडे, क्रीडा शिक्षक बी.एस.माने,ए.बी.पाटील,के.ए.पाटील, आर.के.जोषी,ए.एस.कागले या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापिका सौ.एस. एच.कवठे, पर्यवेक्षक एस.एस.तेली,आर.डी.पिष्टे,सौ.व्ही. एस.लोटके व प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री बखेडी एस बी, व्ही एस कांबळे,ए.बी कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक ए.बी.पाटील यांनी केले. तर आर.डी.पिष्टे यांनी आभार मानले
