शहापूर पोलिसांची मोठी कारवाई : ५ लाखाचा गुटका केला जप्त 

शहापूर पोलिसांची मोठी कारवाई : ५ लाखाचा गुटका केला जप्त
इचलकरंजी शहरातील शहापूर पोलिसांनी गस्त घालत असताना प्रवीण नितीन वाळवेकर हा खंजिरे इंडस्ट्रीयल इस्टेट मध्ये बेकायदेशीरपणे गुटका घेऊन जात आल्याची माहिती मिळाली होती.पोलिसांनी छापा टाकून यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधी सुपारी व  गुटखा असा सुमारे 5 लाख 37 हजार रुपयांचा मुधेमाल जप्त केला आहे.शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.राज्यामध्ये गुटखाबंदी करण्यात आली आहे इचलकरंजी लगत असणाऱ्या कर्नाटकातून राजरोसपणे गुटका इचलकरंजी शहरात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतो गेल्या काही वर्षांपूर्वी इचलकरंजी मध्ये गुटक्याच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून गुटका कारखाने उद्धवस केले होते.पुन्हा चोरून गुटखा  राजरोसपणे शहरात मिळत आहे.आज शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खंजिरे इंडस्ट्रीयल  इस्टेट मध्ये एक गुटखा विक्री करण्यासाठी टेम्पो येणार असल्याची  माहिती पोलिसांना मिळाली होती.तसेच गस्त घालत असताना खंजिरी इंडस्ट्रीयल येथे पेट्रोल पंपाजवळ एक टेम्पो आला असता त्या टेम्पो चालकाकडे चौकशी केले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसी खाक्या दाखवताच व टेम्पोची झडती  घेतली असता टेम्पो चालक नितीन वाळवेकर यांच्याकडे चौकशी केली असा तर त्या टेम्पोमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा सुगंधी गुटखा वेगळ्या  आढळून आला.यामध्ये आरएमडी,स्टार,चक दे अश्या विविध कंपन्याचे सुंगधी तंबाखू(गुटखा) पॅकिंग मध्ये आढळून आला.पोलिसांनी हा सर्व गुटखा जप्त  केला यामध्ये  सुमारे पाच लाख 37 हजार रुपयाचा  मुद्धेमाल  पोलिसांनी जप्त केला आहे शहापूर पोलिसांनी  ही मोठी कारवाई केली  आहे पण शहरांमध्ये  राजरोसपणे  प्रत्येक पान टपरीवर गुटखा मिळत आहे इचलकरंजी शहर हे वस्त्र नगरी असल्यामुळे कामगार वस्ती मोठ्या प्रमाणात आहे  कामगारांना गुटखा तंबाखू सेवन करण्याचे मोठ्या प्रमाणात आहे  त्यामुळे गल्लीबोळामध्ये गुटखा तंबाखू मिळतो याकडे अन्नप्रशासन व पोलिसांनी लक्ष घालून या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून  होऊ लागली  आहे इचलकरंजी शहरांमध्ये सध्या चोरून गुटका जादा दराने  विकला जात आहे कर्नाटकातून राजनसपणे इचलकरंजी शहरांमध्ये गुटखा मोठ्या प्रमाणात येत असतो याकडे मात्र शहरातील पोलीस दुर्लक्ष करत आहेत छोटी मोठी कारवाई दाखवून मोठा गुटखा तस्करीकडे दुर्लक्ष करायचं असा सध्या काय सुरू आहे कर्नाटकातून मोठमोठ्या ट्रक मधून पुणे मुंबई व अन्य ठिकाणी गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा सध्या सर्वसामान्य जनतेमध्ये आहे शहापूर पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होऊ लागले आहे.ही कारवाई आसिफ कलायगार हवालदार कांबळे पोलीस कॉन्स्टेबल धुमाळ यांनी केली.
Spread the love
error: Content is protected !!