‘या’ मागणीसाठी भाजपच्या वतीने प्रांत कार्यालयास निवेदन

इचलकरंजी शहरातील भाजपच्या वतीने दुष्काळग्रस्त हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी तसेच लवकरात लवकर पंचनामे करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी
भाजपच्या वतीने आज प्रांत कार्यालयात  निवेदन देण्यात आले.यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याची मोठी कमतरता
भासत आहे.त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांमध्ये काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.यात जमीन महसुलात सूट,पीक कर्जाचं पुनर्गठन,शेतीशी निगडीत
कर्जाच्या वसुलीस स्थगिती,कृषी पंपाच्या चालू विजबिलाबात सूट,विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुक्लात माफी, रोजगार हमी योजने अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता,पिण्याचे पाणी टँकरने पुरवणे,शेतीच्या पंपाची
वीज जोडणी खंडीत न करणे आदींचा समावेश आहे.या सवलतींची अंमलबजावणी तातडीने करुन विद्यार्थी व शेतकरी वर्गाला लाभ द्यावा,असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले,
शहाजी भोसले,युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड, संगांनियोचे अध्यक्ष अनिल डाळ्या,जिल्हा उपाध्यक्ष मनोज हिंगमिरे, पांडुरंग म्हातुकडे, दीपक पाटील, उमाकांत दाभोळे, आण्णा आवळे,महेश पाटील,अरुण
कुंभार, आबा बनसोडे,उत्तमसिंह,चव्हाण,जहांगीर पट्टेकरी,मारूती पाथरवट, प्रविण पाटील बाळकृष्ण तोतला,मनोज जाधव,प्रशांत शालगर,रणजित आनुसे,प्रविण बनसोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Spread the love
error: Content is protected !!