शिरोळ शहरातील सर्वच आस्थापना वरील फलक मराठीमध्ये लावण्याची सूचना देणे बाबत शिरोळ नगरपरिषदचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव व पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांना मनसे रोजगार
स्वयंरोजगार विभागच्या वतीने निवेदन देण्यात आले.निवेदनामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, १९६१ च्या नियम ६ अन्वये नोंदणी करताना सर्वच आस्थापना वरील
फलक हे मराठीत असणे बंधनकारक असून देखील शिरोळ शहरामध्ये कित्येक आस्थापनावर इंग्रजीमध्ये फलक असल्याचे दिसून येत असल्याचे म्हंटले आहे.
यावेळी प्रशासनाने आजच संबंधित व्यापारी संघटना व
दुकानदार यांना नोटीस बजावली असलेचे सांगितल्याने मनसे शिष्ठमंडळाच्या वतीने प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले.पण २५ डिसेंबर २०२३ पर्यंत जर मराठी पाठ्या झाले नाहीत तर मात्र मनसे स्टाईलने “खळ – खट्याक” आंदोलन छेडू व त्यानंतर जर कायदा व
सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला.यावेळी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष व कामगार सेनेचे कार्यकारणी सदस्य भगवंत जांभळे,मनसे तालुका उपाध्यक्ष सचिन
सूर्यवंशी, रोजगार – स्वयंरोजगार विभाग शिरोळ शहर
संघटक रमेश शिंगाडे,स्वयंरोजगार तालुका संघटक चंद्रकांत शिंदे,महिला आघाडी शहारध्यक्षा प्रियांका नाईक,वाहतूक सेनेचे मा. जिल्हा संघटक संजय
भंडारे,जयसिंगपूर शराध्यक्ष लखन उर्फ निलेश
भिसे,शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदिप वरेकर,महाराष्ट्र सैनिक विलास कदम आदी उपस्थित होते.