‘या’ आहेत भाग्यकारी राशी,१४ डिसेंबर आजचे राशिभविष्य,

आजचे राशिभविष्य – 14 डिसेंबर 2023

मेष – भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. व्यावसायिकांना आज परगावी जावे लागेल

 

वृषभ – सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला.धार्मिक कार्यास वेळ द्याल,मानसिक समाधान मिळेल.आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

 

मिथुन – आज कौटुंबिक काही तक्रारी होतील, जोडीदारावर रागावू शकता.लग्नात काही अडथळा येत असेल तर तो दूर होईल.आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.काही कामे धाडसाने पार पाडाल.
कर्क – न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल, प्रवासात तुमची गाडी खराब होऊन त्रास होईल,काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.वाहने जपून चालवताना काळजी घ्या
सिंह – आरोग्याविषयी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.आज गाडी चालवताना सावधगिरी बाळगा,व्यावसायिकांनी हित शत्रूंपासून सावध राहावे,आज तुम्हाला त्रास देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील,महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
कन्या – आजचा दिवस सामान्य असेल कार्यक्षेत्रात अपेक्षित लाभ न मिळाल्याने आज तुम्ही चिंतेत असाल.आज जोडीदाराला वेळ द्याल,कुटुंबातील सदस्याची अचानक तब्येत बिघडेल प्रॉपर्टीची  कामे मार्गी लागतील.सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

तुळ – मालमत्तेशी संबंधित समाधानकारक बातमी मिळेल,व्यवसायात वाढ होईल. गुरूकृपा लाभेल.आध्यात्मिक प्रगती होईल.उत्तम दिवस जाईल

 

वृश्‍चिक – आजचा दिवस लाभदायक ठरेल,

मनोरंजनाकडे कल राहील.प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.नवीन गाडी खरेदीचा योग असेल आजचा दिवस चांगला असेल.

 

धनु – भविष्यासाठी गुंतवणूक कराल,वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

मकर – नवीन व्यवसाय सुरू कराल,आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील,आज आध्यात्माकडे कल राहील.कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

 

कुंभ – आजचा दिवस कला क्षेत्राला चांगला असेल,मोठा नफा देणार असेल.सरकारी नोकरीशी संबंधित लोक आज दिवस उत्तम,मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

मीन – गुंतवणूक केली तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.राजकीय मंडळींना जनतेचे सहकार्य मिळेल, मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. उत्साह व उमेद वाढेल. आज खर्चाचे प्रमाण वाढेल.

Spread the love
error: Content is protected !!