अस्थमा (दमा )
सद्याच्या वाढत्या प्रदूषणामुळे व बदलत्या जीवन शैलीमुळे दम्याच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.अस्थमा हा आजार अनुवांशिक सुद्धा असू शकतो.यामध्ये फुफुसाचे आकुंचन,प्रसरण व्यवस्थित होत नाही.ढगाळ/थंड वातावरण झाले की यांचा त्रास वाढतो.
कारणे-फ्रिज मधील मधील पदार्थ,प्रदूषण, अयोग्य आहार-विहार,धूळ कारखान्यातील धातू कण /तंतू कण श्वासनमार्गातून आत जाणे,
ऍलर्जी
लक्षणे-धाप लागणे,रुग्ण झोपला असता गुर -गुर असा आवाज येणे,चक्कर,जिव कोंडल्यासारखा होणे,छाती भरणे हि सर्व लक्षणे दिसून येतात.
तपासणी – xray, CT scan
अपथ्य (काय खाऊ नये )
भेंडी,मैशीचे दूध,दही,ताक,बटाटा,हरभरा,उडीद, केळ,वांगी,पापड,लोणचे,मका,फ्रिज मधील पदार्थ,कोल्ड्रिंक
पथ्य (काय खावे)
शेळीचे दूध,लिंबू,कवाळे,चाकवत,देशी गाईचे तूप,ईडलिंबू,लसूण,कांदा,हळद,मध, शेवगा, राजगिरा,तोंडली,कारले,गरम पाणी,दुधी भोपळा, पडवळ,दोडका,लिंबू,मोसंबी,संत्री ,सुंठ,रक्तशाली (लाल कांडलेला भात )
आयुर्वेदिक औषध
कणकासव,वासा घृत,श्वासकुठार रस,तालीसादी चूर्ण
उपाय –
1) भारंगी,कंटकारी,कर्कटशृंगी,वासा ,जेष्ठमध यांचे चूर्ण सम मात्रेत गरम पाण्यातून घेणे.
2)सकाळी थंडीत चालायला जाऊ नये. त्याऐवजी संध्याकाळी चालावे.
3)कोंडट ठिकाणी राहू नये.
4)ऍलर्जी असलेले पदार्थ टाळावे.
5)दूध व दुधाच्या जड पदार्थांचे सेवन करू नये.
6)दररोज नस्य करावे व बाहेर जाताना मास्क लावावे.
7)अनुलोम,विलोम,भस्रिका,प्राणा याम सारखे योगा करावेत
डॉ ओंकार निगनुरे मोबा – 9175723404