शिरगुप्पी येथे डॉ.अप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव बँकेच्या शाखेचे उद्घाटन

शिरगुप्पीत सा.रे.पाटील बँकेच्या शाखेचे उद्घाटन;आर्थिक प्रगतीसाठी,
सहकारी संस्थांचे मोठे योगदान श्रीशैल जगद्गुरु यांचे प्रतिपादन..!
शिरगुप्पी / प्रतिनिधी राजू कोळी
देशातील,आर्थिक विषमता दूर करण्यात सहकारी बँकांचे मोठे योगदान असून सहकारी बँकांतील देवाणघेवाणीमुळे सर्वांचा आर्थिक स्तर उंचावत असल्याचे प्रतिपादन येडूर मठाचे डॉ.चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.

आज कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी येथे डॉ.अप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेच्या १८ व्या शाखेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.यावेळी

अध्यक्षस्थानी दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित  गणपतराव पाटील होते.पुढे बोलताना स्वामीजी म्हणाले,आज समाजात श्रीमंत वर्गाकडे असलेला पैसा सहकारी संस्थांमध्ये ठेवी
ठेवल्यानंतर,गरजू लोकांना या संस्थांकडून कर्जरूपी वितरण होत असल्याने,ठेवीदार व कर्जदार यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यात सहकारी संस्थांचा मोलाचा वाटा आहे.यावेळी कार्यक्रमाचे द्वीपप्रज्वलन स्वामीजी व
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिरगुप्पी शुगरचे चेअरमन कल्लाप्पाण्णा मगेन्नावर, दत्त साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुण देसाई,
संचालक अमर यादव,  इंद्रजीत पाटील,संस्थेचे चेअरमन
महेंद्र बागे, व्हाईस चेअरमन आप्पासो नरुटे,सीबीएसएसके कारखान्याचे संचालक अण्णासाहेब पाटील,महावीर कात्राळे,भम्मांना चौगुले,अभय अकिवाटे,मोहन लोकरे,शंकर मांगलेकर,अशोक कोळेकर,दरगु गावडे,विनायक कदम,मिलिंद
जगदाळे,के.आर.पाटील,जिन्नपा गेदुगूळ, एम.डी.कुलकर्णी,विश्वनाथ माने यांच्यासह शिरगुप्पी परिसरातील संस्थेचे सभासद हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जनार्दन बोटे यांनी केले.तर आभार दामोदर सुतार यांनी मानले.
Spread the love
error: Content is protected !!