मराठीत फलक लावा अन्यथा ‘खळ – खट्याक’ आंदोलन करण्यात येईल – मनसे

शहरातील सर्व आस्थापनावरील फलक मराठीमध्ये लिहावेत
कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड शहरातील सर्वच आस्थापना वरील फलक मराठीमध्ये लावण्याची सूचना देणे बाबत कुरुंदवाड नगरपरिषदचे मुख्याधिकारी आशिष चौहान व पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना महाराष्ट्र नवनिर्माण
महिला सेना कुरुंदवाड शहरच्या वतीने निवेदन देण्यात आले.निवेदनामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, १९६१ च्या नियम ६ अन्वये नोंदणी करताना
सर्वच आस्थापना वरील फलक हे मराठीत असणे बंधनकारक असून देखील कुरुंदवाड शहरामध्ये कित्येक आस्थापनावर इंग्रजीमध्ये फलक असल्याचे दिसून येत असल्याचे म्हंटले आहे.यावेळी मनसे पदाधिकारी यांनी
प्रशासनाने संबंधित आस्थापनेला योग्य त्या सूचना देऊन ते येत्या पंधरा दिवसांमध्ये मराठीमध्ये करून घेण्यास कळवावे अन्यथा २५ डिसेंबर २०२३ नंतर मनसे स्टाईलने “खळ – खट्याक” आंदोलन छेडू व त्यानंतर जर कायदा व
सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा दिला.यावेळी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष व कामगार सेनेचे कार्यकारणी सदस्य भगवंत जांभळे,मनसे महिला आघाडी कुरुंदवाड
शहराध्यक्षा ज्योती शिकलगार,शहर उपाध्यक्षा रजिया सुतार,उपाध्यक्षा सायरा मुल्ला,वाहतूक सेनेचे मा.जिल्हा संघटक संजय भंडारे, जयसिंगपूर शराध्यक्ष लखन उर्फ निलेश भिसे, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदिप वरेकर,
स्वयंरोजगार तालुका संघटक चंद्रकांत शिंदे, शिरोळ शहर संघटक रमेश शिंगाडे,महिला आघाडी शिरोळ शहराध्यक्षा प्रियांका नाईक, महाराष्ट्र सैनिक विलास कदम,सुनीता चव्हाण, मंगल माळी, दिपाली कोळी, नाजनीन मुल्ला,
रूपाली कोळी,लक्ष्मी शिंदे,ज्योती शिकलगार, कविता शिंदे,चंद्रवा मानगुळे,माया कोळी, शमशाद मुल्ला,अश्विनी शिकलगार आदी उपस्थित होते.
Spread the love
error: Content is protected !!