शिरोळ / प्रतिनिधी चंद्रकांत भाट
सरकारी प्राथमिक शाळेतील भौतिक सुविधा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून या समितीच्या
माध्यमातून शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना भेट देऊन शाळेचे कामकाज व भौतिक सुविधा याबाबत तपासणी करण्यात येत आहे
शाळेच्या भौतिक सुविधा शाळेत असणाऱ्या अडचणी
याविषयी सर्वोच्च न्यायालयाने सर्व सरकारी शाळेची पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने शिरोळ तालुक्यातील सरकारी प्राथमिक शाळांच्या तपासणी होत आहेत जयसिंगपूर
न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश गिरीष गुरव यांच्या अध्यक्षतेखाली असणारी समिती शिरोळ तालुक्यातील सरकारी शाळांना भेटी देऊन शाळेच्या कामकाज व भौतिक सुविधा बाबत शाळेची इमारत स्वच्छतागृह
पिण्याचे पाणी शाळेचा परिसर आणि विद्यार्थी व शिक्षकांच्या अडचणी याची माहिती घेऊन अहवाल तयार करीत आहे.मंगळवारी या समितीने चिंचवाड अर्जुनवाड घालवाड कुटवाड कनवाड हसुर शिरटी शिरोळ या
गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेटी देऊन संबंधित शाळेतील भौतिक सुविधा अडीअडचणी शाळेच्या परिसर याबाबत माहिती घेतली शाळेच्या वतीने समितीतील सर्व सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
जिल्हा न्यायाधीश गिरीष गुरव जयसिंगपूर न्यायालय अधीक्षक संजय शिरोळकर पोलीस उपनिरीक्षक पी आर माने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शिंगाडे निवासी नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांच्या समितीने या शाळांची तपासणी केली.