शि रोळ / प्रतिनिधी
श्री दत्त उद्योग समुहाचे शिल्पका र, तालुक्याचे भाग्यविधाते स्व.माजी आमदार डॉ.आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त श्री दत्त शेतकरी सह. साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्टचे आरोग्य केंद्र, आचार्य तुलसी ब्लड बँक जयसिंगपूर, सिध्दीविनायक ब्लड बँक सांगली व एम.एस.आय.ब्लड बँक मिरज यांचे संयुक्त सहकार्याने आरोग्य केंद्रामध्ये दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजलेपासून रक्तदान
शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीराचे उद्घाटन लक्ष्मीकांत देशमुख (माजी जिल्हाधिकारी) यांच्याहस्ते व चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या उपस्थितीत झाले.देशातील गरजू रुग्णांना रक्ताची सोय
व्हावी या सामाजिक उद्देशाने प्रतिवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन कारखान्यामार्फत केले जाते.यावेळी तुलसी ब्लड बँकेचे आरींजय शिरोटे,सिध्दीविनायक ब्लड बँकेचे जितेंद्र पत्की,एम.एस.आय.ब्लड बँकेचे प्रो निळकंठ सगरेव त्यांचे सर्व सहकारी तसेच आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.रेखा शेरबेट, डॉ.गजानन चौगुले, डॉ.प्रिया खाडे,डॉ.कुमार पाटील व त्यांचा सर्व स्टाफ, कारखान्याचे संचालक महेंद्र बागे,अॅड.प्रमोद पाटील,संचालिका विनया घोरपडे, कामगार युनियनचेअध्यक्ष प्रदिप बनगे, कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील, सेक्रेटरी अशोक शिंदे,प्रॉडक्शन मॅनेजर विश्वजीत शिंदे, को-जन.मॅनेजर व्ही.आर.इंगळे, वेल्फेअर ऑफिसर जयदिप देसाई, हेड टाईम किपर राजू केरीपाळे,चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक अंबाप्रसाद नानीवडेकर यांचेसह खाते
प्रमुख,कर्मचारी तसेच उद्योगपती अशोकराव कोळेकर, प्रा. मोहन पाटील,कामगार युनियन,कामगार सोसायटी, दत्त भांडार व चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.या रक्तदान शिबीरामध्ये 352 रक्तदात्यानी रक्तदान केले.