देशी गाय हा फक्त प्राणी नसून समस्त हिंदू बांधवांचा तसेच संपूर्ण भारतवासियांचा अविभाज्य घटक,संस्कृतीचा मान व सदभावना आहे.त्यासाठी केंद्र
सरकारने देशी गाईच्या संवर्धनासाठी,अस्तित्वासाठी उचित पावले उचलावीत.यासाठी केंद्र सरकारने देशी गाईला “नॅशनल डोमेस्टिक ऍनिमल “चा दर्जा देण्यात यावा.जेणेकरून हा कायदा पारीत झाल्यावर देशी गाईचे
संरक्षण होईल,देशी गाईला आपल्या अन्न साखळीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या देशामध्ये ७५ प्रकारच्या देशी गाई आढळून यायच्या पण सद्य स्थितीला त्यापैकी 3 जाती नामशेष व्हायच्या मार्गावर आहेत.
देशी गाईचे महत्व आज साऱ्या जगाला पटले आहे. त्यापासून देशी गाईचे गोमूत्र,दूध,तूप याला परदेशी मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहे.आज जगात सर्वात जास्त देशी गाई ब्राझील मध्ये आहेत.त्या गाई आपल्या देशातून
नेऊन त्यांनी त्यांचे उत्तम प्रकारे संगोपन केले आहे.देशी गाय हि मानव आरोग्यासाठी, शेतीसाठी,निसर्गासाठी अतिमहत्वाची बाब असल्याने वरील सर्व गोष्टींचा आधारभूत घेऊन केंद्र सरकारने देशी गाईला
‘नॅशनल डोमेस्टिक ऍनिमल’चा दर्जा मिळावा यासाठी पंचगव्य चिकित्सक,साधू -संत,मठाधीश,आयुर्वेदिक डॉक्टर्स ,नॅचरोपॅथी डॉक्टर्स, विविध प्राणीमित्र संघटना,सुज्ञ नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन डॉ.ओंकार निंगनुरे यांनी केले आहे.