दिलीपराव माने म्हणजे शिरोळचे भूषण : सचिन हळदक
शिरोळ / प्रतिनिधी
दिलीपराव माने यांनी आयुष्यभर प्रामाणिक व विश्वासाने लोकसेवेचे कार्य केले आहे.सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून त्यानी युवा पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.समाजाप्रती केलेल्या आदर्शवत
कामामुळेच दिलीपराव माने यांच्या कार्याचा गौरव होत असून माने परिवाराचे समाजाभिमुख कार्य शिरोळ गावासाठी भूषणावह आहे, असे मत इचलकरंजी मराठा मंडळाचे उपाध्यक्ष व उघोजक सचिन हळदकर यांनी
व्यक्त केले.येथील रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव माने यांना नुकताच व्होकेशनल सर्विस अवार्ड हा पुरस्कार
देऊन सन्मानित केलेबद्दल उद्योगपती सचिन हळदकर यांच्या हस्ते श्री माने यांचा सत्कार करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी चित्रपट दिग्दर्शक रामभाऊ लामदाडे , कॉन्ट्रॅक्टर रवींद्र शिंगाडे यांनी भाषणात सामाजिक
कार्यकर्ते माने यांच्या कार्याचा गौरव केला.उद्योजक अभिजीत माने,पत्रकार शिवाजी वाघरे ,डॉ दगडू माने , चंद्रकांत भाट,बाळासाहेब कांबळे,पंकज माने,रामभाऊ लामदाडे,लालासाहेब माने यांच्यासह मराठा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.