अन्यथा ‘खळ – खट्याक’ आंदोलन करू मनसेने दिला इशारा

जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर शहरातील सर्वच आस्थापना वरील फलक मराठीमध्ये लावण्याची सूचना देणे बाबत जयसिंगपूर नगरपरिषदच्या उपमुख्याधिकारी प्रमिला माने,पोलीस
निरीक्षक संदिप कोळेकर व जयसिंगपूर व्यापारी महासंघाच्या पदाधिकारी यांना मनसे जयसिंगपूर शहरच्या वतीने निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले
आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, १९६१ च्या नियम ६ अन्वये नोंदणी करताना सर्वच आस्थापना वरील फलक हे मराठीत असणे बंधनकारक असून देखील जयसिंगपूर शहरामध्ये कित्येक आस्थापनावर इंग्रजीमध्ये
फलक असल्याचे दिसून येत असल्याचे म्हंटले आहे.यावेळी मनसे पदाधिकारी यांनी  प्रशासनाने संबंधित आस्थापनेला योग्य त्या सूचना देऊन ते येत्या पंधरा दिवसांमध्ये मराठीमध्ये करून घेण्यास कळवावे
अन्यथा २५ डिसेंबर नंतर मनसे स्टाईलने  “खळ – खट्याक” आंदोलन छेडू व त्यानंतर जर कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला प्रशासन
जबाबदार असेल असा इशारा दिला.यावेळी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष व कामगार सेनेचे कार्यकारणी सदस्य भगवंत जांभळे,शिरोळ तालुकाध्य कुमार पुदाले, जयसिंगपूर शराध्यक्ष लखन उर्फ निलेश भिसे, तालुका
सचिव युवराज आडसुळे,वाहतूक सेनेचे मा.जिल्हा संघटक संजय भंडारे,शहर सचिव ऋषिकेश पाटील,शहर उपाध्यक्ष भूपाल कोळी, राजेंद्र कर्नाळे,शेतकरी सेनेचे
तालुकाध्यक्ष प्रदिप वरेकर,स्वयंरोजगार तालुका संघटक चंद्रकांत शिंदे,शहर संघटक योगेश चव्हाण,चिपरी शाखाध्यक्ष अनिस धारवडकर,महाराष्ट्र सैनिक दत्ता डोलारे,विलास कदम,अमित पाटील आदी उपस्थित होते.
Spread the love
error: Content is protected !!