पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोलीच्या विकास हाच आमचा ध्यास आहे आणि यामध्ये माजी आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ.शौमिका महाडिक यांच्या शुभ हस्ते व लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा करपे यांच्या शुभ हस्ते कामास शुभारंभ करणेत आला.त्यावेळी शिरोली गावास कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही. तसेच गावास स्वच्छ व सुंदर बनवून आणि अस्वच्छतेचे साम्राज्य जाऊन नागरिकांचे आरोग्य चांगले राहणार आहे.हा निधी शिरोलीच्या विकाससासाठी निधी मंजूर केल्या बद्दल उपसरपंच अविनाश कोळी यांनी आभार मानले.तसेच एका वर्षात कोट्यावधी रुपयांचा फंड दिला व ग्रामसचिवालय मटन मार्केट यांच्या नवीन कामास मंजुरी देण्यात आली असून प्राथमिक आरोग्य केंद्राची ठिकाणी ड्रामा केअर सेंटरला मंजुरी द्यावी अशी मागणी महंमद महात यांनी माजी आमदार अमल महाडिक व सौ शौमिका महाडिक यांच्याकडे केली.यावेळी राजाराम साखर कारखाने संचालक दिलीप पाटील,भाजप तालुका अध्यक्ष राजेश पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश पाटील, ग्राम विकास अधिकारी ए वाय कदम,सर्व ग्रामपंचायत सदस्य व सदस्या ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 5
अंगणवाडी क्रमांक 223 बांधकाम करणे श्रीराम तरुण मंडळ यादववाडी निधी चे स्वरूप 11.25लाख
2) 15 व्या वित्त आयोग बाळासोव्हनागडे घर ते नसरदी सर घर ते छ.शाहू नगर गटर्स बांधकाम निधी चे स्वरूप 13 लाख
3) 15 व्या वित्त आयोग देवेकर घर ते विजय पाटील घर रस्ता कॉक्रीटीकरण निधी चे स्वरूप 7लाख
प्राथमिक आरोग्य केंद्र मधील कामे
1) जिल्हा वार्षिक नियोजन (DPDC) कंपाऊंड वॉलचे बांधकाम निधी चे स्वरूप 28 लाख
2) जिल्हा वार्षिक नियोजन (DPDC) शव विच्छेदन कक्ष बांधकाम निधी चे स्वरूप 20लाख