भाजपा महिला मोर्चाच्यावतीने खा.धिरज साहूंच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चपलांचा हार व काळे फासून निषेध व्यक्त

शिरोळ / प्रतिनिधी

मोहब्बत की दुकान में,लूट का सामान,मळलेला हात करतो जनतेचा घात,कॉग्रेस का हात भ्रष्टाचार के साथ’अश्या घोषणा देत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा हातकणंगले लोकसभा संयोजिका ॲड.डॉ.सोनाली मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली 

शिरोळ तहसील कार्यालयासमोर खासदार धिरज साहूंच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चपलांचा हार व काळे फासून निषेध व्यक्त करण्यात आला.काँग्रेसचे झारखंडमधील राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्यावर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या

छाप्यांत ३०० कोटी रुपयांची रोकड मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राज्यभरात आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.


आज शिरोळ येथील तहसीलदार कार्यालयासमोर महिलांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.गरीबीचा नारा देणाऱ्या काँग्रेसने याबाबत थोडी तरी लाज बाळगावी.सरकारने भ्रष्ट काँग्रेसच्या नेत्यांवर छापे मारून त्यांची अवैध संपत्ती जप्त

करावी,अशीही मागणी ॲड.डॉ.सोनाली मगदूम यांनी केली. यावेळी महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा उज्वला बरगाले,वंदना पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शेकडो महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Spread the love
error: Content is protected !!