अंगणवाडी सेविकांच्या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ डोक्याला काळ्या पट्ट्या बांधून ठिय्या आंदोलन
कुरुंदवाड / प्रतिनिधी सुरेश कांबळे
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ येथील शिवतीर्थ चौकात अंगणवाडी सेविकांनी डोक्याला काळ्या पट्ट्या बांधून खासदार धैर्यशील माने,आमदार विनय कोरे यांना दाखवून निषेध व्यक्त केला.आंदोलनासाठी महिलांनी काळा
पोशाख परिधान करून आंदोलनाचे लक्ष वेधले होते.
कुरुंदवाड शिवतीर्थ चौकात महिलांनी जवळपास तीन तास ठिय्या मारत आंदोलन केले.लोकप्रतिनिधी,केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून
सोडला होता.सपोनि रविराज फडणीस यांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता.दरम्यान खासदार धैर्यशील माने यांनी निवेदन स्वीकारून गेल्या ३० वर्षांपासून अंगणवाडी सेविकांच्या मागण्या आहेत.माझ्या अंगणवाडीसेविकांच्या मागण्या कधी पूर्ण
करणार आहात असा प्रश्न विचारला आहे.येणाऱ्या अधिवेशनात या मागण्यांसाठी लोकसभेत तर आमदार विनय कोरे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवू आणि मागण्यांबाबत सरकारकडे पाठपुरावा करून मागण्या मान्य होण्याच्या दृष्टीने
प्रयत्न करू असे आश्वासन दिले.यावेळी बोलताना कॉ.आप्पा पाटील म्हणाले अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांची पदे ही वैधानिक पदे आहेत.त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच आहे.म्हणून त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या
अनुषंगाने येणारी वेतन श्रेणी,ग्रॅच्युईटी,भविष्य निर्वाहनिधी आदि सामाजीक सुरक्षा द्याव्यात.अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकाना दरमहा २६ हजार रुपये व मदतनिसाना २० हजार रुपये दरमहा मानधन द्यावे अशी मागणी खासदार,आमदारांनी याबाबत शासनस्तरावर कोणताच आवाज
उठवलेला नाही हा आमच्यावर अन्याय असून आमच्या मागण्यांसाठी रक्त साडावे लागले तरी आम्ही मागे सरकणार नाही असे सांगितले.यावेळी जयश्री पाटील,शोभा भंडारे,अंजली शिरसागर,दिलशाद नदाफ आदींनी भाषणे केली.दरम्यान खासदार माने आणि आमदार कोरे यांना यायला उशीर झाल्याने
त्यांच्या निषेधार्थ महिलांनी जोरदार घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला.यावेळी शिरोळ,हातकणंगले,इचलकरंजी,शाहुवाडी, पन्हाळा तालुक्यातील हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.