सांगली फाटा येथील कुंटणखान्याचा भांडाफोड
अभिषेक लॉजवर पोलिसांचा छापा : दोघांना अटक; पीडितेची सुटका
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
सांगली फाटा येथील अभिषेक लॉजवर सुरू असलेल्या असलेल्य कुंटणखान्याचा भांडाफोड झाला. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण संयुक्त पथकाने छापा टाकून दोघांना अटक केली, तर लॉजमधून एका पीडितेची सुटका करण्यात आली.
लॉजमधील कर्मचारी परशुराम कल्लाप्पा बडक्याळे (वय ६५, रा. उचगाव, ता. करवीर) व संजय भरत मिठारी (५६, कारंडे मळा,
कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी ही माहिती दिली.
सांगली फाटा येथील अभिषेक लॉजवर कुंटनखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी निरीक्षक कळमकर यांना छापा टाकून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार वेल्हाळ व स्थानिक गुन्हे अन्वेषण संयुक्त
पथकाने सोमवारी दुपारी ही कारवाई केली. लॉज चालविणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
ग्राहकाकडून अडीच हजार रुपये घेऊन पीडित महिलेला एक हजार रुपये देण्यात येत होते, अशी माहिती चौकशीत निष्पन्न झाली आहे. असेही कळमकर यांनी सांगितले. महिला कॉन्स्टेबल धनश्री संतराम पाटील यांनी संशयिताविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.