शिरोळ तालुक्यात कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागा – जगदाळे

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा २६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

नांदणी / प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांचा २६ वा वर्धापन दिन नांदणी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात शिरोळ तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.

वर्धापन दिनानिमित्त आयोजित बैठकीत विक्रमसिंह जगदाळे यांनी शिरोळ तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तत्करतेने तयारी सुरू करण्याचे आवाहन केले.कार्यकर्त्यांनी गावपातळीपासून संपर्क साधत पक्षाचे विचार आणि धोरणे जनतेपर्यंत पोहोचवावीत,असे आवाहन त्यांनी केले.

जगदाळे यांनी यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, “राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हा जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष आहे.आपल्याकडे एक मजबूत नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची ताकद आहे. हेच भांडवल करून आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवायचा आहे.

या कार्यक्रमात शिरोळ तालुक्यातील विविध गावांतील पदाधिकारी,महिला आघाडी,युवक आघाडी आणि सोशल मीडिया टीमचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रवादीचे संस्थापक शरदचंद्र पवार यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.

Spread the love
error: Content is protected !!