शिरोळ / प्रतिनिधी
येणाऱ्या नांदणी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) स्वबळावर लढणार असल्याची अधिकृत घोषणा शिरोळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली आहे.नांदणी येथे आयोजित एका विशेष बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
या बैठकीत शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे,युवक तालुका अध्यक्ष नागेश कोळी, शिरोळ तालुका युवक सरचिटणीस सतीश भंडारे,तालुका उपाध्यक्ष किरण पाटील, विधान सभा अध्यक्ष विशाल जाधव, शिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. डी. पी. कदम, शिरोळ शहराध्यक्ष धनाजी नाईक, युवक कार्याध्यक्ष निशांत निटवे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत पक्षाच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर करताना, आगामी काळात गावात विकासकामांवर भर देण्याचा आणि युवकांना प्राधान्य देण्याचा निर्धार करण्यात आला. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
यावेळी नांदणी शहराध्यक्ष तौफिक कुरणे, उपाध्यक्ष प्रथमेश चव्हाण, उमेश भंडारे, प्रमोद पाटील, अंकुश चव्हाण, सौरभ माने, अरबाज चिक्कोडे, आजर कुरणे, बापू हजारे, पिंटू जंगटे, सचिन बंडगर, शुभम माने, आशपाक भाई, उदय बंडगर, राहुल मोगलाडे, संजय परवेगार यांच्यासह गावातील असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकसंघ प्रयत्न करण्याचे आणि पक्षाच्या विचारधारेनुसार काम करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे येणारी ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.