पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
कोल्हापूर येथील गोखले काँलेज जवळ भरधाव डंपरने बस थांब्यावर निवार्यासाठी उभारलेल्या शिक्षिका आराध्या प्रसाद सावंत वय ३६ यांना चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
आराध्या सावंत या नागाव ता. हातकणंगले येथील असून त्यांचे माहेर हॉकी स्टेडियम परीसरात आहे.त्या डिलिव्हरी च्या निमित्ताने माहेरी रहात होत्या.त्या न्यू पँलेस येथील शाहू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या. शाळा सुटल्यानंतर आपल्या दुचाकीवरून हॉकी स्टेडियम परीसरात असलेल्या घरी निघाल्या असता पाऊस आल्याने त्या निवार्यासाठी रस्त्याच्या बाजूस थांबल्या असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांना चिरडले त्या गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादर्म्यान त्याचा मृत्यू झाला. त्यांचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते त्यांना नऊ महिन्यांची मुलगी आहे.एका बेदरकार डंपरने एका कुटुंबाला उध्वस्त केले तर नऊ महिन्यांच्या कोवळ्या बालिकेची आई हिराऊन पोरके केले.