शिरोळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे हरवलेल्या मुलीचा तात्काळ शोध,मुलीच्या पालकांनी केले पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक 

शिरोळ / प्रतिनिधी 

 

नृसिंहवाडी येथे हरवलेल्या ३ वर्षाच्या मुलीचा तात्काळ शोध घेऊन तिला आई-वडिलांच्या स्वाधीन करून शिरोळ पोलिसांनी कर्तव्यापोटी दाखविलेल्या सतर्कतेचे कौतुक होत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की डोंबिवली(ठाणे कल्याण) येथील प्रकाश मनोहर मांजरेकर व सौ राजेश्वरी प्रकाश मांजरेकर हे दाम्पत्य आपली मुलगी नूविका हिच्यासमवेत शनिवारी सकाळी श्री दत्त दर्शनासाठी नृसिंहवाडी येथे आले होते.श्री दत्त दर्शन करून जात असताना गर्दीत त्यांची मुलगी नूविका हिला विसरून गेले.पुढे गाडीतून ते खिद्रापूरला दर्शनासाठी गेले.खिद्रापूर येथे गेल्यानंतर त्यांना आपली मुलगी नूविका हिला आपण नृसिंहवाडी येथेच सोडून आलो आहे.हे लक्षात आले. मुलगी हरवल्याचे लक्षात आल्यानंतर या दोघांचाही जीव कासावीस झाला. यानंतर मांजरेकर यांनी तात्काळ शिरोळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आपली मुलगी नूविका हि नृसिंहवाडीत हरवली आहे.तिचा शोध घेण्याची विनंती केली. शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी तात्काळ या घटनेकडे लक्ष देऊन पोलीस कर्मचाऱ्यांना मुलीचा शोध घेण्यासंदर्भात सूचना केल्या. पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाबा पटेल, पोलीस हवालदार प्रकाश हाके,पोलीस कॉन्स्टेबल खराडे आणि पोलीस मित्र शरद सुतार, नृसिंह सरस्वती दत्त देवस्थान समितीचे कर्मचारी अभिजीत शिंदे यांनी नृसिंहवाडी येथे त्या मुलीचा शोध घेतला.हरवलेली नूविका सापडल्यानंतर त्यांनी तिच्या पालकांशी संपर्क साधून तुमची मुलगी सुखरूप असल्याचे सांगितले. खिद्रापूरहून मांजरेकर दाम्पत्य नृसिंहवाडी येथे परत आल्यानंतर त्यांच्यी मुलगी नूविकाला त्यांच्याकडे सुखरूप स्वाधीन केले. शिरोळ पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासातच हरवलेल्या मुलीचा शोध लागून तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.काही काळासाठी ताटातूट झालेल्या मुलीची भेट झाल्यानंतर आई-वडिलांचाही जीव भांड्यात पडला.शिरोळ पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Spread the love
error: Content is protected !!