शिरोली येथे तिहेरी अपघातात १ ठार तर १३ जण जखमी

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

 

पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरोली औद्योगिक वसाहतीतील मेनन पिस्टन्स कंपनीसमोर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल बसने थांबलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅव्हल्स मधील एक जागीच ठार, दोघेजण गंभीर तर १३ किरकोळ जखमी झाले आहेत.जखमींना कोल्हापूर येथील सिपिआर शासकीय रुग्णालयात व काही जखमींना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे . ट्रॅव्हल्सलाही पाठीमागून इको कारची धडक बसली हा विचित्र अपघात आज शनिवारी सकाळी ७ वाजण्यासुमार घडला.पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार नाकोडा कंपनीची स्लीपर कोच ट्रॅव्हल बस (क्र. एम एच ०९ जी जे ६७५९ ) ही पुणे निगडी ते बेळगाव असे ३६ प्रवासी घेवून निघाली होती. चालक संदीप शंकरराव चांगभले ( वय ५४ रा. हरीनगर निपाणी ) हा बेळगावकडे हा गाडी चालवत होता .ही बस शिरोली औद्योगिक वसाहत येथील मेनन पिस्टन्स कंपनीसमोर अन्य एका वाहणास ओव्हरटेक करत असताना रस्त्याच्या बाजूस चाकातील हवा कमी झाल्याने थांबलेल्या मालवाहू कंटेनर ( क्र. एम एच ४६ ए आर ५१८२ ,) ला ट्रॅव्हलची जोराची धडक बसून ट्रॅव्हल्सचा क्लिअर सौरभ ऊर्फ रोहण अजित कुलकर्णी ( वय ३० रा खडकलाट चिकोडी ) हा जागीच ठार झाला ट्रॅव्हलची धडक झाल्याने ट्रॅव्हल्स जागीच थांबल्याने मागून येणारी इको कार ( क्र. एम एच ५० यु ३७६५,) ही ट्रॅव्हल्सला धडकली.या अपघातात ट्रॅव्हल्स मधील जखमींची नावे प्रवीण भैरू पुमनाचे ( वय 33 निपाणी ) , संदीप शंकरराव चलमले ( वय 53 ) , नारायण वाटलेकर ( वय 23 ) महेश पाटील ( वय 30 ) , ऐश्वर्या गुडकर ( वय 26 ) सोनाली मोरे , देवराज मोरे ( वय 28 ) , स्वदेश देसाई ( वय 25 ) अशी आहेत.इको कार चालक राजेश भिमराव सुतार ( वय 46 रा संभूर ता पाटण , जि सातारा हे सरनोबतवाडी येथील कॅन्सर हाॅस्पिटला किसन जाधव या पेशंटना घेवून जात होते हि धडक होताच इको कारमधील दोन एअर बॅग ओपन झाल्याने कार चालक व बाजूस बसलेला पेशंटचा मुलगा महेश जाधव व पेशंट हे तिघे अपघातातून सुखरूप बचावले अपघाता वेळी कारचे स्पिड हे ६५ किमीचे होते यावरून असे समजते कि धडकलेल्या ट्रॅव्हल्सचे स्पिड हे ७० ते ७५ किमीचे असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे . हा अपघात इतका भिषण होता की त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी झालेल्यांना तात्काळ अँम्बुलंनस मधून उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.

Spread the love
error: Content is protected !!