शिरोळ प्रतिनिधी चंद्रकांत भाट
जायंटस् फेडरेशन.२ क मधील युनिट क्रमांक १० ची दुसरी कॉन्फरन्स मौजे आगर हॉटेल मंजुश्री येथे उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.जायंटस् फेडरेशनचे युनिट डायरेक्टर सुधिर(भैय्या)कुलकर्णी यांनी घंटानाद करून
कॉन्फरन्सची सुरवात केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पार्थना करण्यात आली.ओपनिंग रिमार्क डायरेक्टर सुधिर कुलकर्णी यांनी दिले जायंटस् फेडरेशन युनिट मधील जयसिंगपूर सिटी,शिरोळ सहेली,दुर्गा सहेली,सन्मती सांगली या ग्रुप्सचे अहवाल वाचन झाले.घालवाड आणि दिव्या सहेली या नूतन
ग्रुप्सचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.या कॉन्फरन्ससाठी सेंट्रल कमिटी मेंबर डॉ.अनिल माळी,फेड.माजी अध्यक्षा डॉ.सौ.सुवर्णा माळी,डॉ.राजकुमार पोळ,फेड.अध्यक्ष अँड विकास पाटील,फेड.समन्वयक सौ.स्नेहल कुलकर्णी, फेड.ऑफिसर सौ.हेमलता जाधव,युनिट ऑफिसर सौ.संगीता
जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.उपस्थितांना मान्यवरांचे मौलिक मार्गदर्शन झाले.मान्यवरांकडून बऱ्याच शंकांचे निरसन करण्यात आले.मान्यवरांचे हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आली.मान्यवरांनी सर्व ग्रुप्सचे कौतुक केले.जायंटस् फेडरेशन१०
मध्ये २ नवीन ग्रुप्स २ युवक ग्रुप आणि २ ग्रुप्स मध्ये ५०% सदस्य वृद्धी झाल्याबद्दल सर्वांनी सुधिर कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.क्लोजिंग रिमार्क डायरेक्टर यांनी दिले.वंदे मातरमने कॉन्फरन्सची सांगता झाली.