पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
जागतिक पातळीवर आय टी क्षेत्राचे महत्त्व वाढल्याने भावी पिडीने बदलत्या काळानुसार शिक्षणावर भर दिला पाहीजे असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यानी नागांव येथील सिटीझन सिंडिकेट कन्सल्टन्सी या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले .
यावेळी अजितदादा पवार यांचे स्वागत कंपनीचे मालक सुमलेश कांबळे ,मधुकर कांबळे यानी केले.पुढे बोलताना म्हणाले की गेल्या १५ वर्षाहून अधिक काळ राजकीय व सामाजिक क्षेत्रांत सिटीझन सिंडिकेट कन्सल्टन्सी वैयक्तीक व संस्थात्मक रित्या काम करत आहे. त्यानी विविध राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणूका बरोबरच प्रादेशिक पक्षांच्या विविध संघटनात्मक पातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.पक्षपातळी बरोबरच विधानसभा व लोकसभा निवडणूकीत ग्राउंड सर्व्हेच्या माध्यमातून आजपर्यंत ४ राज्यात विविध राष्ट्रीय पक्षांसाठी ओपिनियन पोलचे काम केले आहे. राजकीय सल्लागार म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका ते विधानसभा व लोकसभा निवडणूकील ग्राउंड सर्व्हे डॉक्यूमेंटरी, वॉर रूम मॅनेजमेट डेटा विश्लेषण ट्रेनिंग, पी. आर. ब्रण्डींग, इव्हेंट मॅनेजमेंट, सेलिब्रेटी मॅनेजमेंट इत्यादी सेवा पुरवते.सामाजिक, राजकीय, शैक्षणिक साहित्य – कला – क्रिडा कृषी पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या व्यक्तींचे मुलाखत व मार्गदर्शन अशा स्वरुपात सुरू करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र संवाद या डिजिटल प्लॅटफॉर्मचा उद्घाटन सोहळा मेट्रोसिटीच्या धरतीवर ग्रामीण भागातील कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.यावेळी मंत्री हसन मुश्रीफ , आमदार अमल महाडीक, माजी आमदार राजेश पाटील , माजी आमदार राजीव आवळे , आदिल फरास , बाबासाहेब पाटील आसुर्लेकर , लोकनियुक्त सरपंच विमल शिंदे ,सुनिल कांबळे, माजी सरपंच शशिकांत खवरे , कृष्णात करपे , विजय पाटील, रणजित केळूस्कर, प्रकाश पोवार , माजी सरपंच अरूण माळी , विजय पाटील, आदी उपस्थित होते…