पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
तीन दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र वळीव पावसाने मान्सून प्रमाणे दमदार हजेरी लावल्याने अनेक अनेकांची तारांबळ उडाली असून ठिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गटारी तुंबून रस्त्यासह घरांमध्ये पाणी शिरत आहे असाच प्रकार नागाव ता हातकणंगले येथील इंदिरानगर झोपडपट्टीत गटारीचे पाणी शिरल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे .
मे महिन्यात पडणाऱ्या वळीव पावसाने मान्सून पावसाप्रमाणे तिन दिवस दमदार सुरुवात करून जिल्ह्याला पाणी प्रश्न सुखःद केला असला तरी या पावसाने मात्र लोंकांची तारांबळ उडवली ठिक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून गटारी तुंबून वाहत आहेत अशाच प्रकारे नागाव येथील इंदिरानगर झोपडपट्टीत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने या ठिकाणच्या गटारी मुझल्या असल्याने पाण्यास जाण्यास वाट नसल्याने पाणी थेट लोकवस्तीती घरांमध्ये घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली घरामध्ये गुढघाभर पाण्यातून आपले प्रापंचिक साहीत्य खराब होऊ नये यासाठी त्याना भर पावसात आटापिटा करावा लागला.
महामार्गाचे काम सुरू असले तरी सेवा रस्त्यावरील गटारीचे काम महामार्ग ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांकडून झाले पाहीजे त्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी या परिसराची पाहणी करणे गरजेचे आहे जेणेकरून भर पावसाळ्यात गटारी तुंबल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून परिसरात रोगराई पसरू नये यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहीजे